पोस्ट्स

Ten Stories (Ancient)/ दहा प्राचीन कथा आणि प्रेरणादायक भौगोलिक घटना

इमेज
#दहा प्राचीन कथा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतील अशा भौगोलिक घटना ( मित्रानो, मी तुमच्यासाठी जगभर प्रसिद्ध अश्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या पुरातन कथा घेऊन आलो आहे. आवडल्यास नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा  व प्रेरणा द्या.) शास्त्रज्ञांच्या मते, जर आपण खोलवर खोल खणले तर आपल्याला दंतकथा आणि निर्मितीच्या कथांमध्ये काही सत्य सापडेल मिथकांनी हजारो वर्षांपासून मानवांच्या कल्पनाशक्ती आणि आत्म्यांना आहार दिला आहे. या कथांपैकी बहुतेक कथा लोक कित्येक कालखंडात सांगत असलेल्या कथा आहेत. परंतु काहींच्या भूतकाळातील भूगर्भशास्त्रीय घटनांमध्ये मूळ समस्या आहेत आणि संभाव्य धोक्यांलचा इशारा देतात आणि आपण ग्रहाच्या सामर्थ्यासाठी धैर्याने बोलतो. नोहाचे जहाज फ्लोट करता येईल का? सिद्धांत मध्ये, होय ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट युनिव्हर्सिटीचे भू-शास्त्रज्ञ पॅट्रिक नून म्हणतात की, पॅसिफिकमधील नैसर्गिक धोके आणि कथांदरम्यानच्या दुवांचा अभ्यास करणाऱ्या भूगर्भविज्ञानी पॅट्रिक नून म्हणतात, की या कथांनी त्यांच्या साक्षीदारांच्या निरीक्षणाला एकोड केले आहे. प्रथम काय आले हे सांगण्याचा कोणताही मार्ग नाही, आ...

#Gudipadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३/What is mean by Gudipadwa?

इमेज
#GudiPadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३   गुढीपाडवा म्हणजे काय?/What is mean by Gudipadwa?#Muhurt, #Rituals and #Significance of #Gudi Padwa या वर्षी गुढीपाडवा बुधवार, दिनांक २२ मार्च २०२३ रोजी  येत आहे. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे "चैत्र शुद्ध प्रतिपदेला" म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रांतात साजरा केला जातो. "शालिवाहन संवत्सराचा" पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ नवउपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, इत्यादी  गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हि विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.   तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ "लाकूड अथवा काठी आहे." तसाच तो "तोरण" असाही आहे.  गुढीपाडवा हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, संवत्सर पाडवो अथवा उगादी अश्या वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो तर सिंधी बांधव चेटीचंद नावाने या उत्सवाला संबोधतात.   गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप कसे असते?/Structure/n...

#Toilet - Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet

इमेज
टॉयलेट - एक वैचारिक साधन  माझ्या प्रिय मित्रांनो, मी माझ्या मनातल्या भावना तुमच्याशी माझ्या ब्लॉग मधून सांगत असतो. आजची कथा हि देखील अशीच गमतीशीर आहे. पूर्ण वाचा आणि नक्की वाचा व वाचून झाले कि आपल्याला काय वाटते कंमेंट करून नक्की सांगा.   गावातल्या त्या हाळ (पाण्याने भरलेला हौद) कडे गेलो, आणि मी माझा माझाच जोरात हसायला लागलो. .... असेल दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी दिवाळीच्या सुटीमध्ये गावाकडे गेलेलो होतो. दिवाळी असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. जे काही मंडळी बाहेर गावी कामानिमित्ताने सुरत, मुंबई ई. ठिकाणी असतात ते हि दिवाळीकरिता गावाकडे आलेले होते.  #Toilet -  Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet गावात जास्तीत जास्त मंडळी हि हात मजुरी करणारी मोल मजुरी करणारी होती. त्यामुळे ते जेव्हा सुरतहुन किंवा मुंबई पुणे अश्या मोठ्या शहरातून गावाकडे यायचे तेव्हा त्यांचे राहणीमान बदललेले असायचे मग कोणी छान जीन्स घालून यायचे, रंगीबेरंगी टी शर्ट नावाची वस्तू देखील त्यावेळी गावात नवीन आणि आकर्षक वाटायची. आणि ते सर्व नवीन राहणीमान पाहून ...

#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl

इमेज
 आजची विषकन्या /Vishkanya #विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl      वैदिक साहित्य, लोक कथा आणि इतिहासानुसार ज्या स्त्रीला अगदी लहानपणापासूनच थोडे थोडे विष देऊन त्यांना विषच्या आदी बनवले जाते त्यांना विषकन्या संबोधले जाते. अश्या स्त्रियांना विषारी वृक्ष, पशु व पक्षीसोबत राहण्याकरिता सवय लावली जायची. त्याचसोबत स्त्रियांमध्ये असलेले गुण जसे कि, संगीत, नृत्य, गायन यांचेही शिक्षण दिले जायचे. तत्कालीन राजांद्वारे या विषकन्येचा वापर करून राज्याचे अंतर्गत किंवा बाहेर असलेले शत्रू राजांना छळ करून मृत्यू  देण्याकरिता अश्या विष कन्यांना सर्व प्रकारचे छळ कपटाच्या विद्येमध्ये पारंगत केले जायचे. सर्व प्रकारच्या शत्रू राजांच्या शरीरात आपले विष पोचवण्याकरिता सर्व विषकन्या पारंगत होत्या. जसे कि, सांगितले जाते कि, विषकन्यांचा श्वास देखील विषारी असायचा. अश्या विषकन्यांचा श्वास जर कोणी ग्रहण केला तर शत्रू थोड्याच वेळात आजारी पडायचे किंवा त्यांना मृत्यू यायचा.  विषकन्या आपल्या मुखात विष ठेऊन चुंबन घेण्याच्या बहाण्याने शत्रूच्या शरीरात विष टाकायचे. विषकन्येची ...

खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi

इमेज
खान्देशचा तगतराव  खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi                     तिकडे गावाकडे खान्देशात गेलेलो होतो, सालाबादप्रमाणे त्या वर्षीही गावाकडे तगतरावांची मिरवणूक निघते आणि हे तगतराव यात्रेलाच असतात. आता तगतराव म्हणजे काय हो असा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. तर तगतराव म्हणजे गावामध्ये यात्रेच्या पहिल्याच दिवशी तमाशा असतो त्या तमाश्यामधील कलाकार यांची मिरवणूक पूर्ण गावातून काढली जाते. त्यात स्त्री कलाकार देखील असतात आणि त्या तमाशा मंडळात काम करणाऱ्या स्त्री पुरुष कलाकारांची जेव्हा मिरवणूक काढली जाते त्यावेळी गावातील खूप सर्व मंडळी मुले माणसे पुरुष स्त्रिया या सर्व उत्सवात सामील होतात. यालाच म्हणतात तगतराव.  खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi                        तर मंडळी, मी पण या तगतरावच्या उत्सवात सामील झालो, आणि इतर मुलांप्रमाणे मी पण त्या सुंदर स्त्रियांकडे एकटक पाहून वेगवेगळे विचार करू...

Sankalp/संकल्प/31December

इमेज
संकल्प  आज दिनांक ३१/१२/२०१९,  लक्षात आले असेलच आज ३१ डिसेंबर!  नेहमीप्रमाणे तयारी करून मी  माझ्या मोटर सायकलने रस्त्याने भरधाव निघालो, सकाळचे ८.४५ झाले होते, पण काय मोठे आश्चर्यच घडले. रस्ता कसा सामसूम होता.  मनात वेगळेवेगळे विचार सुरु झालेले होते. एकटाच होतो, डिसेम्बरची थंडी कमालीचं गारठा देत होती.   मनात विचार येत होता कि, काय आज मी पण ३१ डिसेंबर हा दारू पिऊन साजरा करावा?   कि, मग मी पण कुठेतरी पार्टीत जाऊन किंवा शेतात जाऊन एकदम झिंगाट व्हावे काहीच सुचत नाही. आज शहरात किंवा गावात सुद्धा पब, बार, मॉल सगळं अगदी एखाद्या नवीन नवरीप्रमाणे सजून तयार असतील. कोणी कार्यक्रमांची जय्यत तयारी केलेली असेल, तर कोणी हॉटेलमध्येच सगळी तयारी केलेली असेल. आणि जास्त धमाल करण्याकरिता तर काही ठिकाणी नवीन नवीन ऑफर देखील आलेल्या असतील. मला पण या गोष्टींचं खूपच आकर्षण वाटते. खरंतर वर्ष २०१९ हे मला फारच वाईट गेले, काय मी माझ्या नाशिबाला दोष देऊ कि मग नेहमीप्रमाणे फक्त लढतच पुढे वाटचाल करत राहू? जस जसे वर्ष जात आहेत तशी ती वर्ष मला माझ्या एका वर्षाने वयस्कर...

#अस्तंभा - एक थरार/#Astamba/Astambha Rushi/#Astamba rushi yatra

इमेज
अस्तंभा - एक थरार अनुभव  मित्रांनो, मी स्वतः नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असतो. साहजिकच, नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असल्यामुळे अस्तंबा ऋषी यात्रेची बऱ्यापैकी माहिती मला आहे. अस्तंबा हे एक सातपुडा पर्वतराजीतील बसलेले छोटेसे देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः लक्ष्मीपूजनाच्या २ ते ३ दिवस अगोदर अस्तंबा ऋषी देवस्थानावर यात्रा असते. या यात्रेसाठी हजारो भाविक पायी अस्तंब्याचा डोंगर चढण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, व गुजरात इथून भाविक हजारोंच्या संख्येने हजर असतात.  असेल साधारणतः ५ -६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्हाला देखील फारच हाऊस असल्यामुळे आम्ही साधारण ४ ते ५ मित्रानी ठरवले कि आपणही अस्तंब्याला जाऊया मग काय आमची जय्यत तयारी सुरु झाली. तसे आमचे बरेचसे मित्र हे तळोद्यात असतात आणि अस्तंब्याची यात्रा हि तळोद्यापासूनच खरी सुरु होते. त्यामुळे मला जास्त ताणच नव्हता. मग ठरल्याप्रमाणे मी तळोद्यात आलो सर्व तयारी उरकून आम्ही संध्याकाळी साडेचार नंतर प्रवासाला सुरुवात केली. तळोद्यापासून आम्हाला पायी प्रवास करायचा होता. प्रवास रात्रभर होणार होता आणि थंडीचे प्रमाणही वाढलेल...