#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl


 आजची विषकन्या /Vishkanya



https://tickutalk.blogspot.com/2020/02/vishkanya-snake-girl.html
#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl

 
  वैदिक साहित्य, लोक कथा आणि इतिहासानुसार ज्या स्त्रीला अगदी लहानपणापासूनच थोडे थोडे विष देऊन त्यांना विषच्या आदी बनवले जाते त्यांना विषकन्या संबोधले जाते. अश्या स्त्रियांना विषारी वृक्ष, पशु व पक्षीसोबत राहण्याकरिता सवय लावली जायची. त्याचसोबत स्त्रियांमध्ये असलेले गुण जसे कि, संगीत, नृत्य, गायन यांचेही शिक्षण दिले जायचे. तत्कालीन राजांद्वारे या विषकन्येचा वापर करून राज्याचे अंतर्गत किंवा बाहेर असलेले शत्रू राजांना छळ करून मृत्यू  देण्याकरिता अश्या विष कन्यांना सर्व प्रकारचे छळ कपटाच्या विद्येमध्ये पारंगत केले जायचे.
सर्व प्रकारच्या शत्रू राजांच्या शरीरात आपले विष पोचवण्याकरिता सर्व विषकन्या पारंगत होत्या. जसे कि, सांगितले जाते कि, विषकन्यांचा श्वास देखील विषारी असायचा. अश्या विषकन्यांचा श्वास जर कोणी ग्रहण केला तर शत्रू थोड्याच वेळात आजारी पडायचे किंवा त्यांना मृत्यू यायचा.  विषकन्या आपल्या मुखात विष ठेऊन चुंबन घेण्याच्या बहाण्याने शत्रूच्या शरीरात विष टाकायचे.


विषकन्येची ऐतिहासिक पार्श्वभूमी 
इतिहासात नमूद केल्यानुसार, कौटिल्य शास्त्र चे रचयिता चाणक्याच्या बाबतीत सांगितले जाते कि, त्यांनी मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य च्या प्राणांची खूपवेळा रक्षा केली ज्यामध्ये काही वार हे विषकन्यांच्या वापर करून पण केले गेलेले होते. त्यापैकीचा एक प्रसंग -
https://tickutalk.blogspot.com/2020/02/vishkanya-snake-girl.html
#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl
एक वेळेची गोष्ट आहे, नंद वंश चे तत्कालीन सम्राट धनानंद च्या एका मंत्र्याने षडयंत्र केले. त्याने छळपूर्वक युद्ध जिंकून परत येत असताना चंद्रगुप्त मौर्य च्या स्वागतासाठी एका विषकन्येला पाठवले. परंतु, विषकन्या जशी चंद्रगुप्ताच्या रथाच्या समोर आली तशीच मधेच चाणक्याने तिला थांबवून चंद्रगुप्ताच्या सोबत असलेल्या राजा प्रवर्तनकाला सांगितले कि, या "रूपवान व सुंदर स्त्रीचा तुम्ही स्वीकार करा."  त्यानुसार राजा प्रवर्तकाने विषकन्येचा स्वीकार केला. राजा प्रवर्तक हे युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांचे सहयोगी होते. म्हणून राज्याच्या नियमानुसार, राजा प्रवर्तकाला अर्धे राज्य दिले जाणार होते. परंतु, जसे राजा प्रवर्तकाने विषकन्येचा हात हातात धरला तसे विषकन्येच्या हाताला लागलेला घाम राजा प्रवर्तकाच्या हाताला लागला. त्यामुळे राजा प्रवर्तकाच्या शरीरात विष पसरून तो आजारी पडला. त्याने त्याचा मित्रचंद्रगुप्त मौर्याला मदतीसाठी बोलावले. चंद्रगुप्तने राज्याच्या सर्व वैद्यांना त्याच्या उपचारासाठी नियुक्त केले. परंतु, विष शरीरात इतके पसरले होते कि त्याला नाही वाचवले जाऊ शकले व शेवटी राजा प्रवर्तकाचा मृत्यू झाला. 
या घटनेवरून काही इतिहासकार असा अर्थ काढतात कि, चाणक्याने जाणूनबुजून विषकन्येला राजा प्रवर्तकडे पाठविले होते. त्यांचे असेही  म्हणणे आहे कि, चंद्रगुप्तच्या जीवित रक्षणाकरिता राजा प्रवर्तकाचे मरणे आवश्यक होते. 


राजनैतिक नियमानुसार जेव्हा केव्हा एक राज्य दोन राज्यांमध्ये अर्धे अर्धे वाटले जाते, तेव्हा एक ना एक दिवस त्या दोघान्मधे युद्ध जरूर होते. परंतु हा मात्र एक अनुमान आहे.
या घटनेनंतर चाणक्याने चंद्रगुप्तला येणाऱ्या काळात विषकन्येच्या प्रभावापासून वाचण्याकरिता अन्नातून अल्प मात्रेमध्ये विष द्यायला सुरुवात केली व प्रत्येक दिवशी विषाची मात्रा वाढवण्याची व्यवस्था ठेवली. जेणेकरून, भविष्यात चंद्रगुप्त काळत नकळत एखाद्या विषकन्येच्या संपर्कात आला तर तो सुरक्षित राहू शकेल. या प्रकारे चंद्रगुप विषाच्या प्रभावापासून पूर्णता सुरक्षित होता.
एके दिवसाची गोष्ट आहे, सम्राट चंद्रगुप्त भोजन करत होते. त्याचवेळी तिथे त्यांच्या गर्भवती महाराणींचे आगमन झाले. महाराजाना भोजन करताना पाहून महाराणीची पण महाराजांसोबत भोजन  करण्याची इच्छा झाली. इच्छेनुसार महाराणीने चंद्रगुप्तच्या ताटातून एक घास खालला. परंतु अन्नात असलेल्या विषाच्या प्रभावामुळे महाराणी काही क्षणातच मूर्च्छित झाली.
राजा चंद्रगप्तने सर्व राजवैद्यानं बोलावून महाराणीच्या मूर्च्छित होण्याची गोष्ट सांगितली. परंतु, कोणताही राजवैद्याला राणीच्या मूर्च्छित होण्याचे कारण माहित नव्हते. तेव्हाच हि गोष्ट चाणक्याला माहित झाली. त्यांना माहित होते कि राणी मूर्च्छित का झाली. त्यांनी ताबडतोब शल्य चिकित्सकांना बोलावून घेतले व राणीच्या गर्भातील बालकाला काढून जन्माला घातले. बालक तर वाचले परंतु महाराणीचा मृत्यू झाला.
महाराणीच्या विषयुक्त जेवणाने बालकावर काही विशेष फरक नाही पडला परंतु त्याच्या ललाटवर एक निळे निशाण बनले होते. ललाटवर तयार झालेल्या त्या निळ्या निशाणीमुळेच चंद्रगुप्तने त्याचे नाव बिंदुसार ठेवले. पुढे जाऊन  हाच बिंदुसार राज्य विस्तार आणि जैन धर्म प्रचारासाठी प्रसिद्ध झाला.
याप्रकारे, विषकन्यांद्वारे छळपूर्वक शत्रू राजांची हत्या केली जायची व राजाच्याच शुभचिंतकांद्वारे त्यांच्याच सुरक्षेकरिता त्यांना पण अल्पमात्रेत विष देऊन विशपुरुष बनविले जायचे. जेणेकरून कुठल्याही विषकन्येचा त्यांच्यावर प्रभाव पडू नये.
मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर ही कथा तुमच्या मित्राना नक्की शेयर करा.

 ========================================================================
1 ek vishkanya sitara ek vishkanya ki kahani video ek vishkanya serial ek vishkanya kahani vishkanya last episode vishkanya last episode full vishkanya last episode written update vishkanya legend vishkanya live vishkanya latest news vishkanya last full episode 144 vishkanya last vishkanya love story vishkanya meaning vishkanya movie hindi vishkanya movie 1991 vishkanya movie cast vishkanya maurya vishkanya meaning in english vishkanya meaning in hindi vishkanya malika vishkanya movie 2019 vishkanya novel vishkanya natak nagin vishkanya note vishkanya nagin video vishkanya nagin 2 vishkanya nagin ka natak vishkanya natak dikhaye vishkanya natak vishkanya natak vishkanya on voot vishkanya on colors vishkanya online vishkanya ozee vishkanya on colours vishkanya old movie vishkanya on colors tv vishkanya on zee tv vishkanya photo vishkanya promo vishkanya plot vishkanya pehla bhag vishkanya picture vishkanya pdf download vishkanya pathfinder vishkanya pathfinder names vishkanya pooja bedi vishkanya quora vishkanya real vishkanya romantic episode vishkanya reality vishkanya real story vishkanya ringtone vishkanya real story in english vishkanya romance vishkanya really exist vishkanya serial cast vishkanya show vishkanya serial video mein 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture