#अस्तंभा - एक थरार/#Astamba/Astambha Rushi/#Astamba rushi yatra
अस्तंभा - एक थरार अनुभव
मित्रांनो, मी स्वतः नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असतो. साहजिकच,
नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असल्यामुळे अस्तंबा ऋषी यात्रेची बऱ्यापैकी माहिती मला आहे. अस्तंबा हे एक सातपुडा पर्वतराजीतील बसलेले छोटेसे देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः
लक्ष्मीपूजनाच्या २ ते ३ दिवस अगोदर अस्तंबा ऋषी देवस्थानावर यात्रा असते.
या यात्रेसाठी हजारो भाविक पायी अस्तंब्याचा डोंगर चढण्यासाठी महाराष्ट्र,
मध्यप्रदेश, व गुजरात इथून भाविक हजारोंच्या संख्येने हजर असतात.
असेल साधारणतः ५ -६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्हाला देखील फारच हाऊस असल्यामुळे आम्ही साधारण ४ ते ५ मित्रानी ठरवले कि आपणही अस्तंब्याला जाऊया मग काय आमची जय्यत तयारी सुरु झाली. तसे आमचे बरेचसे मित्र हे तळोद्यात असतात आणि अस्तंब्याची यात्रा हि तळोद्यापासूनच खरी सुरु होते. त्यामुळे मला जास्त ताणच नव्हता. मग ठरल्याप्रमाणे मी तळोद्यात आलो सर्व तयारी उरकून आम्ही संध्याकाळी साडेचार नंतर प्रवासाला सुरुवात केली. तळोद्यापासून आम्हाला पायी प्रवास करायचा होता. प्रवास रात्रभर होणार होता आणि थंडीचे प्रमाणही वाढलेले होते. त्यावेळी जास्तीत जास्त लोक, रस्ता दिसावा म्हणून हातात टेम्भे घेऊन जायचे. टेम्भे म्हणजे मशाली सारखेच पण थोडेसे वेगळे. सायकलचे टायर जाळायचे व ते हातात धरून मार्गक्रमण करायचे कारण त्यावेळी पहाडात फारच अंधार असतो.

You can also Visit :- https://indiamotorbike.com/
आमचा प्रवास सुरु झालेला होता. मी आणि माझ्यासोबत किशोर, देवा, सुनील, सुनीलचा भाचा महेश, असे आम्ही पाचही जण बरेच पायी चालून आल्यावर "नकट्या देव" नावाचे एक स्थान आले तो पहाड चढाई साठी फारच कठीण वाटत होता, अंगात भरलेली थंडी सगळी गायब झालेली होती व थंडा घाम देखील यायला लागला होता. आम्ही सगळ्यांनी कसाबसा पहाड पार केला आणि थोडीशी सपाटी लागली व त्या सपाटीवर थोडेसे पुढे जाऊन आम्हाला एक झोप काढायची होती कारण आम्ही सतत ७ ते ८ तास चालून खूपच थकलेलो होतो त्यामुळे आम्हाला आरामाची फारच आवश्यकता होती.
पण पुढे येणारी आमची वेळ खूपच वाईट येणार होती. पुढे आमच्यासाठी संकट वाढून ठेवलेले होते आणि त्याची सुरुवात महेशच्या स्वरूपात सुरु झालेली होती. महेशला अचानकच उलट्या व्हायला लागल्यात. आम्हाला वाटले पहाड चढून आल्यामुळे थोडीशी उलटी होत असेल. मग आम्ही त्याला सोबत आणलेला निंबू व पाणी दिले. फक्त तीन ते पाच मिनिट त्याला फरक पडला. त्यानंतर परत त्याला उलट्या सुरु झाल्यात. आम्हाला काहीच सुचेना काहीच काळात नव्हते, जसजशी वेळ जात होती तसतशी त्याची प्रकृती खालावू लागली होती. आता तर त्याला पाणी सुद्धा पचत नव्हते एक घोट पाणी पिल्यावर तो चार घोट पाणी बाहेर काढायचा. आणि नंतर तर उभे देखील राहवत नव्हते. आम्ही सगळे हैराण झालो. करायचे काय हाच प्रश्न सर्वांसमोर उभा होता. कारण तिथे ना मोबाईलची रेंज होती ना दवाखाना. मग सगळे शांत झाल्यावर माझ्याच डोक्यात एक विचार आला, मी त्याला माझ्या खांद्यावर उचलून घेतले. पण उचलून फक्त दहा - पंधरा पाऊले चालत नाही तोपर्यंत त्याला जास्तच त्रास होऊ लागला. त्याने सांगितले कि माझे पोट दाबले जात आहे आणि त्यामुळे जास्त त्रास होत आहे. त्यावेळी महेशला कसेतरी करून जुन्या अस्तंब्या पर्यंत पोचवणे खूपच गरजेचे होते. कारण तिथे तरी एखादा डॉक्टर जर आलेला असेल तर त्याद्वारे थोडा वेळ इलाज होऊ शकत होता. आता फटाफट निर्णय घेणे आवश्यक होते. मी देवाला व सुनीलला सूचना वजा आदेश केलेत, कि येथून जुना अस्तंबा १२ किलोमीटर आहे तुम्ही पुढे जा आणि कोणी डॉक्टर असतांब्याला आलेले असतील तर त्यांना थांबवा. प्रत्येक सुशिक्षित जो दिसेल त्याला विचारा पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही चार जणांनी चादरीवरच त्याला लेटवले व तेथून त्याला १२ किलोमीटर पर्यंत आलटून पालटून जुन्या अस्तंब्यापर्यंत कसेबसे पोचवले. मग सगळे ताबडतोब कामाला लागलेत. तिथे मोठी यात्रा भरते. पहाटेचे झाले असतील दोन अडीच. आम्ही सगळेच्या सगळे कामाला लागलो चारही जण चारी दिशेला गेलो शेवटी एका ठिकाणी योगा योगाने एक डॉक्टर आमच्यासारखेच तिथे फिरायला आलेले होते. त्यांनी महेशला तपासून सांगितले कि, तब्बेत जास्तच खराब आहे. ताबडतोब घरी घेऊन जा. मग तिथून मुख्य शहरासाठी वाहने उपलब्ध होती. कसेबसे महेशला व सुनीलला आम्ही रवाना केले आणि सोबत देवा देखील निघून गेला मग मी आणि किशोर अस्तंब्याला जाऊन दर्शन घेतले आणि अत्यंत दयनीय परिस्थिती व थकलेल्या परिस्थितीत आम्ही तळोद्याला रवाना झालो होतो.
You can also Visit :- https://indiamotorbike.com/
नंतर दोन ते तीन महिन्यानंतर, मी सहजच तळोद्याला गेलेलो होतो. त्यावेळी किशोर सोबत गप्पा करता करता महेशचा विषय निघाला. सोबत थोड्याच वेळात सुनील पण आला. मग मीच उत्सुकतेपोटी विचारले कि, महेश तुझा कोण लागतो, त्यावर सुनील बोलला कि माझा भाचा लागतो. त्यावर किशोर अवाक होऊन पाहू लागला. आणि बोलला कि, तिथे मामा भाचा, सोबत जात नाहीत. नाहीतर, अस्तंबा ऋषी महाराज तुम्हाला पोहचू देत नाहीत. हे सगळे ऐकून मी पण कुठेतरी विचारात मग्न झालेलो होतो. कारण कि अंधश्रद्धा होती कि ....... कारण जे काही असेल ते ..... पण माझ्यासोबत घडलेली घटना मात्र सत्य होती. ....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
astamba rodali astamba dongar astamba yatra 2019 astamba height astamba geet astamba ka video astamba shikhar astamba parvat astamba dongar height astamba rushi maharaj astamba adivasi rodali adivasi astamba adivasi astamba rushi maharaj astamba video adivasi astamba rushi maharaj adivasi rodali astamba rushi adivasi rodali astamba baba astamba video com astamba diwali astamba delhi asthma dog astamba darshan astamba gujarat astamba mountain in gujarat astamba hill astamba hill station astamba mountain height astamba mountain height in meters astamba in gujarat where is astana located astamba yatra astamba yatra video astamba ki video astamba ki astamba kahani astamba ki rodali astamba rushi ke video astamba rushi maharaj ki yatra astamba peak location astamba maharashtra astamba maharaj astamba mandir astamba mela astamba maharaj video astamba rushi maharaj rodali adivasi astamba nandurbar astamba new rodali astamba peak astamba photo astamba parvat video astamba pahar satpura parvat astamba yatra astamba rushi maharaj ki jay astamba rushi maharaj ki astamba rushi maharaj

Very nice.
उत्तर द्याहटवाखुप छान भाऊ
उत्तर द्याहटवाDhanyawad bhau
हटवाYou are doing nice job sir....
उत्तर द्याहटवाPlease check my site dhadgaontimes.com
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाyour website is not indexed on google... indexed it...
हटवा