#Gudipadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३/What is mean by Gudipadwa?
#GudiPadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३
गुढीपाडवा म्हणजे काय?/What is mean by Gudipadwa?#Muhurt, #Rituals and #Significance of #Gudi Padwaया वर्षी गुढीपाडवा बुधवार, दिनांक २२ मार्च २०२३ रोजी येत आहे. गुढीपाडवा
हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे "चैत्र शुद्ध
प्रतिपदेला" म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील
अनेक प्रांतात साजरा केला जातो. "शालिवाहन संवत्सराचा" पहिला दिवस असून
साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी,
व्यवसाय प्रारंभ नवउपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, इत्यादी गोष्टी
केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हि विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे
मानले जाते.
तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ "लाकूड अथवा काठी आहे." तसाच तो "तोरण" असाही आहे.
गुढीपाडवा हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, संवत्सर पाडवो
अथवा उगादी अश्या वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो तर सिंधी बांधव चेटीचंद
नावाने या उत्सवाला संबोधतात.
गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप कसे असते?/Structure/nature of Gudipadwa/गुढी कशी उभारतात?/How to Make Gudi?
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात आणि नंतर गुढीपाडव्याच्या गुढी उभारतात.
बांधून त्यावर तांबे, पितळ, कांस्य अथवा असल्यास चांदीचे गडू
किंवा फुलपात्र बसवले जाते. ज्या जागेवर गुढी लावायची आहे ती जागा स्वच्छ
करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला
जातो. तयार केलेली गुढी दिसेल अश्या जागेवर दारात, उंच गच्चीवर/ गॅलरीत
लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात.
गुढीची पूजा करतात, निरंजन लावून उदबत्ती दाखवितात. दूध साखरेचा, पेढ्यांचा
नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी
सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळदी कुंकू वाहून व फुलांची अक्षता टाकून हि
गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करून आप्तेष्ठना
नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले जाते. गुढीसाठी
उंच बाम्बुपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या
वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडू
निंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, आणि साखरेची गाठी किंवा
साखरेचे हार
गुढीपाडव्याचे आरोग्यदृष्टया महत्व काय?/what is the importance of gudipadwa in accordance to our health?
पूर्वी,
चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या
पानाबरोबर वाटून खायचे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे
करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या
अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची
पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून त्याचा रस पिणे हे शारीरिक
दृष्ट्या हितकारक समजले जाते.
येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.!!
गुढीपाडव्याची थोडक्यात माहिती आपल्याला आवडल्यास कृपया आपल्या मित्रांना शेयर करा आणि माझ्या ब्लॉगला फॉलो करा.
==========================================================================================
gudi
padwa gudi padwa 2020 gudi padwa 2019 gudi padwa images gudi padwa
information gudi padwa in marathi gudi padwa information in marathi gudi
padwa drawing gudi padwa 2021 gudi padwa 2018 gudi padwa ads gudi padwa
activity gudi padwa and sambhaji.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please, do not enter any spam link in the comment box