#Toilet - Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet
टॉयलेट - एक वैचारिक साधन माझ्या प्रिय मित्रांनो, मी माझ्या मनातल्या भावना तुमच्याशी माझ्या ब्लॉग मधून सांगत असतो. आजची कथा हि देखील अशीच गमतीशीर आहे. पूर्ण वाचा आणि नक्की वाचा व वाचून झाले कि आपल्याला काय वाटते कंमेंट करून नक्की सांगा. गावातल्या त्या हाळ (पाण्याने भरलेला हौद) कडे गेलो, आणि मी माझा माझाच जोरात हसायला लागलो. .... असेल दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी दिवाळीच्या सुटीमध्ये गावाकडे गेलेलो होतो. दिवाळी असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. जे काही मंडळी बाहेर गावी कामानिमित्ताने सुरत, मुंबई ई. ठिकाणी असतात ते हि दिवाळीकरिता गावाकडे आलेले होते. #Toilet - Means of Thinking/#टॉयलेट - एक वैचारिक साधन/Toilet गावात जास्तीत जास्त मंडळी हि हात मजुरी करणारी मोल मजुरी करणारी होती. त्यामुळे ते जेव्हा सुरतहुन किंवा मुंबई पुणे अश्या मोठ्या शहरातून गावाकडे यायचे तेव्हा त्यांचे राहणीमान बदललेले असायचे मग कोणी छान जीन्स घालून यायचे, रंगीबेरंगी टी शर्ट नावाची वस्तू देखील त्यावेळी गावात नवीन आणि आकर्षक वाटायची. आणि ते सर्व नवीन राहणीमान पाहून ...