#अस्तंभा - एक थरार/#Astamba/Astambha Rushi/#Astamba rushi yatra
अस्तंभा - एक थरार अनुभव मित्रांनो, मी स्वतः नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असतो. साहजिकच, नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असल्यामुळे अस्तंबा ऋषी यात्रेची बऱ्यापैकी माहिती मला आहे. अस्तंबा हे एक सातपुडा पर्वतराजीतील बसलेले छोटेसे देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः लक्ष्मीपूजनाच्या २ ते ३ दिवस अगोदर अस्तंबा ऋषी देवस्थानावर यात्रा असते. या यात्रेसाठी हजारो भाविक पायी अस्तंब्याचा डोंगर चढण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, व गुजरात इथून भाविक हजारोंच्या संख्येने हजर असतात. असेल साधारणतः ५ -६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्हाला देखील फारच हाऊस असल्यामुळे आम्ही साधारण ४ ते ५ मित्रानी ठरवले कि आपणही अस्तंब्याला जाऊया मग काय आमची जय्यत तयारी सुरु झाली. तसे आमचे बरेचसे मित्र हे तळोद्यात असतात आणि अस्तंब्याची यात्रा हि तळोद्यापासूनच खरी सुरु होते. त्यामुळे मला जास्त ताणच नव्हता. मग ठरल्याप्रमाणे मी तळोद्यात आलो सर्व तयारी उरकून आम्ही संध्याकाळी साडेचार नंतर प्रवासाला सुरुवात केली. तळोद्यापासून आम्हाला पायी प्रवास करायचा होता. प्रवास रात्रभर होणार होता आणि थंडीचे प्रमाणही वाढलेल...