खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi
तिकडे गावाकडे खान्देशात गेलेलो होतो, सालाबादप्रमाणे त्या वर्षीही गावाकडे तगतरावांची मिरवणूक निघते आणि हे तगतराव यात्रेलाच असतात. आता तगतराव म्हणजे काय हो असा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. तर तगतराव म्हणजे गावामध्ये यात्रेच्या पहिल्याच दिवशी तमाशा असतो त्या तमाश्यामधील कलाकार यांची मिरवणूक पूर्ण गावातून काढली जाते. त्यात स्त्री कलाकार देखील असतात आणि त्या तमाशा मंडळात काम करणाऱ्या स्त्री पुरुष कलाकारांची जेव्हा मिरवणूक काढली जाते त्यावेळी गावातील खूप सर्व मंडळी मुले माणसे पुरुष स्त्रिया या सर्व उत्सवात सामील होतात. यालाच म्हणतात तगतराव.
तर मंडळी, मी पण या तगतरावच्या उत्सवात सामील झालो, आणि इतर मुलांप्रमाणे मी पण त्या सुंदर स्त्रियांकडे एकटक पाहून वेगवेगळे विचार करू लागलो. कारण त्या सगळ्या फार सुंदर होत्या. त्यांच्यापैकी सर्व साड्यावर होत्या फक्त एकाच मुलगी जीन्स वर होती. त्यामुळे सगळे पोरं ज्या मुलीकडे एकटक पाहत होते किंवा सगळ्यांना आवडणारी सर्वात सुंदर मुलगी जी छान ब्लॅक जीन्स आणि तिचे सुंदर शरीराचे थोडेसे दर्शन होईल असे शॉर्ट टी शर्ट तिने घातलेले होते. त्यावेळी गावाकडे अश्या गोष्टी पाहायला मिळणे दुर्मिळच! मग अशी पर्वणी आल्यावर सगळेच तिच्याच मागे.
खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi |
मग तगतरावांची मिरवणूक संपल्यावर सर्वांची निवांत आराम करायला एका जागी त्यांची व्यवस्था केलेली होती. इतरांप्रमाणे माझेही लक्ष फक्त आणि फक्त त्या जीन्सवालीवरच होते. मग काय आता सगळेच गावातील तरुण मंडळी तिच्याशी सेटिंग करण्याकरिता उत्सुक होते. पण काही केल्या कोणाचाच टाळा बसत नव्हता. काही टवाळांमध्ये तर तिला पटवण्यासाठी पैज पण लागलेली होती. कोणाचा पहिला नंबर लागतो याकडे काहींचे लक्ष लागलेले होते. मग तमाशा संध्याकाळी होता. आता कलाकार मंडळी निवांत होती आणि जेवणाखावणाची तयारी सुरु होती. मग अश्या निवांत क्षणी मधेच कोणी गुटखा, पान, तंबाखू खात होते. आणि ती जीन्स वालीने पण मग हळूच छातीत लपवलेल्या बटव्यातून पैसे काढले आणि कोणाला तरी छोट्या मुलाला गुटखा आणायला सांगितले. मी पण शेजारीच उभा होतो नेमका त्याच वेळेस तिची आणि माझी नजरानजर झाली आणि तिने हळूच स्मित केले. तिच्या हास्यात एक कमालीचा मधाळपणा होता आणि डोळ्यात कमालीची धुंद होती. रात्रीची तिची अवस्था आणखीनच मला धुंद करत होती.
तस मी पण या सगळ्या वातावरणात चांगलाच रमून गेलेलो होतो.रात्रीची वेळ होती काही पुरुष कलाकारांनी पण स्त्रियांचा वेष परिधान केलेला होता कारण त्यांना तमाश्यामध्ये स्त्री कलाकारांसोबत नाचायचे होते. मग असाच तिच्या भोवती रेंगाळता रेंगाळता शेवटी तिच्याशी बोलायला मिळाले. मग तिने मला सांगितले कि मला बोलायचे आहे पण अगोदर एक डान्स करून येऊ दे, तू तोपर्यंत इथेच थांब. ती तोडकेमोडके बोलता बोलता खान्देशी/अहिराणी भाषेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत होती. मग थोड्या वेळाने तिचेच गाणे आणि डान्स होता. ती स्टेज वर गेली आणि इतर दोन कलाकारांसोबत नाचू लागली , तर काय धम्माल जेवढे पाहणारे होते तेवढ्यांच्या शिट्या फक्त तीच्याच साठी होत्या. तिचे गाणे संपले गावातील काही धनाढ्य व बलाढ्या समजणारे तिच्या अवती भोवती पिंगा घालू लागलेत पण काहीच कोणाचा टाळा बसला नाही.

तिचे गाणे संपल्यावर ती मागच्या बाजूने स्टेज खाली उतरली आणि गुणगुणत माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मग आम्ही एक धाब्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो आणि दिलखुलास गप्पा करू लागलो. येणारे जाणारे टवाळ पाहत होतेच!..... मग गप्पा करता करता कळले कि ती मुंबईकडची होती. मुंबईकडची असल्यामुळे ती अगदी बिनधास्त होती.
त्यावेळी तिने जीवनात काय काय केले त्याबद्दल ती थोडक्यात बोलली. इकडे गावाकडे ती पहिल्यांदाच आलेली होती. त्यामुळे इकडच्या शांत जीवनाचे तिला फार आकर्षण वाटत होते. बोलता बोलता तिने सांगून टाकले कि मी गावो गावी कार्यक्रम करत फिरते आणि त्या कार्यक्रमांवरच आईचे व तिचे पोट भरते.
ती मुंबईच्या कुठल्यातरी परिसरात राहत होती. पण तिला कार्यक्रमाच्या निमित्ताने महिनोंमहिने जाता येत नव्हते. बाकी नातेवाईक नव्हते. तिने तिच्याबद्दल काहीच लपवलेले नव्हते. पुढे तिने सांगितले कि, ती मुंबईमध्ये वेश्या व्यवसाय करते. हे अस ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि शांत बसून विचार करू लागलो. खूप स्तब्ध होऊन अगदी बारकाईने विचार करू लागलो.ती जे काही सांगत होती ते अगदी बारकाईने ऐकू लागलो होतो. मी इतरांप्रमाणेच तिच्यासाठी दिवसभर पिंगा घालत होतो आणि जेव्हा वेळ आली तिच्याशी बोलण्याची तर कानाला बोचेल इतका कटू सत्य तिने माझ्यासमोर उघड केलेले होते. मग काही क्षण असा वाटले कि इथून पळ काढावा. आतापर्यंत मनात असा विचारही नव्हता पण आत्ता अशीही भीती वाटू लागली कि लोकांनी पाहिले, कोणी पाहिले तर काय विचार करेल? मी असा, मी तसा मग तिथे खूप खूप गोष्टी माझ्या मनात घर करू लागल्या होत्या. मग असा विचार करता करता आणि तिचे सांगितलेले ऐकता ऐकता रात्रीचे अकरा साडे अकरा झाले असतील मलाही झोप यायला लागली होती. जाता जाता तिने सांगितले कि उद्या माझा कार्यक्रम अमुक ठिकाणी आहे उद्या ये भेटायला.
रात्रीत खूप विचार करून झाला होता तिने सत्य सांगितले तर त्यात वाईट तरी काय? ती या गोष्टी माझ्यापासून लपवू शकली असती. पण तिने तस केला नाही. माझ्यापासून काहीच लपवले नाही. ती जरी वेश्या व्यवसाय करणारी असली तरी, एखाद्या कपटी आणि लुटारू मुलीपेक्षा तिची वागणूक निश्चितच चांगली होती. त्यानंतर मी आणि ती चौफुलीवर भेटलो छान चहा घेतला आणि थोड्या वेळ बसून पुन्हा गप्पा केल्यात तिने मला तिचा मोबाइलला नंबर दिला माझाही मोबाइलला नंबर घेतला.... आणि खूप वेळ म्हणजे कदाचित २ ते ३ तास आम्ही एकमेकांसोबत गप्पा केल्यात आणि खूप टाईम पास पण केला. कारण ती आमची पहिली आणि शेवटची भेट होती. तिला मी माझ्या मोटर सायकलने तिच्या मुक्कामाच्या स्थळी सोडायला गेलो. आणि तिला कधी न भेटण्यासाठी तिचा निरोप घेतला.
हम्म्म्म आजही मी मागते वळून जेव्हा जेव्हा त्या गोष्टींची आठवण करतो तेव्हा तेव्हा मला तिची एक सज्जन मुलगी म्हणून आठवण होते. ज्या गोष्टीना उपेक्षित म्हणून पाहिले जाते अश्या उपेक्षितांपैकीच ती एक होती. पण तिची आठवण माझ्या स्मरणात सदैव राहील.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
to z khandeshi song send a khandeshi devi song send a khandeshi song show me a khandeshi song khandesh band khandesh bharit khandesh baner khandesh bhasha khandesh brides khandesh baba khandesh bpo services pvt ltd khandesh barat video khandesh burhanpur khandeshi b login khandesh chotu khandesh central khandesh chotu dada khandesh comedy chotu dada khandesh cities khandesh chotu comedy khandesh comedy new khandesh central jalgaon khandesh c khandeshi c khandesh district khandesh dj khandesh dada khandesh dj song khandesh division khandesh district gazetteer khandesh dubai khandeshi darbar khandeshi d j song khandeshi d khandesh d j song khandeshi d j mp3 song khandeshi d u f f d'mart khandeshwar d'mart khandeshwar address g d khandeshe d'mart near khandeshwar

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please, do not enter any spam link in the comment box