Sankalp/संकल्प/31December

संकल्प 

आज दिनांक ३१/१२/२०१९,  लक्षात आले असेलच आज ३१ डिसेंबर! 


Image result for 31st celebration pictures


नेहमीप्रमाणे तयारी करून मी  माझ्या मोटर सायकलने रस्त्याने भरधाव निघालो, सकाळचे ८.४५ झाले होते, पण काय मोठे आश्चर्यच घडले. रस्ता कसा सामसूम होता.  मनात वेगळेवेगळे विचार सुरु झालेले होते. एकटाच होतो, डिसेम्बरची थंडी कमालीचं गारठा देत होती.  मनात विचार येत होता कि, काय आज मी पण ३१ डिसेंबर हा दारू पिऊन साजरा करावा?

  कि, मग मी पण कुठेतरी पार्टीत जाऊन किंवा शेतात जाऊन एकदम झिंगाट व्हावे काहीच सुचत नाही. आज शहरात किंवा गावात सुद्धा पब, बार, मॉल सगळं अगदी एखाद्या नवीन नवरीप्रमाणे सजून तयार असतील. कोणी कार्यक्रमांची जय्यत तयारी केलेली असेल, तर कोणी हॉटेलमध्येच सगळी तयारी केलेली असेल. आणि जास्त धमाल करण्याकरिता तर काही ठिकाणी नवीन नवीन ऑफर देखील आलेल्या असतील. मला पण या गोष्टींचं खूपच आकर्षण वाटते. खरंतर वर्ष २०१९ हे मला फारच वाईट गेले, काय मी माझ्या नाशिबाला दोष देऊ कि मग नेहमीप्रमाणे फक्त लढतच पुढे वाटचाल करत राहू? जस जसे वर्ष जात आहेत तशी ती वर्ष मला माझ्या एका वर्षाने वयस्कर होण्याची आठवण करून देतात. वर्ष अशी संपत चालली, आयुष्य कमी कमी होत चालले आहे इतक्या कमी वयात मी काय काय करावे? काहीच आता सुचत नाहीच आहे ..... 

काय मी आतापर्यंत ३१ डिसेंबर स्वतःचे दुःख विसरण्यासाठीच साजरा करत होतो का? कि मग कुठेतरी स्वतःलाच जगापासून दूर नेण्याकरिता? कि मग सुखाच्या आशेसाठी मी त्या पार्ट्या धुंडाळत होतो? खरंतर अश्या कार्यक्रमासाठी जाणे म्हणजे स्वताला एकदम काळोखात, एकदम खोल अश्या गर्तेत लोटण्यासारखेच मला आता वाटत आहे, कि मग येणारे नवीन वर्ष आपल्या अश्या साजऱ्या करण्यामुळे चांगलीच येतात असा कदाचित माझा समज/गैरसमज असेल. हा सर्व विचार करता करता माझा प्रवास पण सुरु होताच. 

हा प्रवास तर कुठे ना कुठेतरी थांबणारच आहे. हा विचार करत असतां माझे स्थान केव्हा आले ते कळलेच नाही. असो.. जे काही असेल ते...... या वर्षाच्या खूप - खूप  आठवणी दुःख आणि सुख यांना माझ्या मनात दडवून नवीन वर्षात वाटचाल करूयात आणि हो.. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे सुदृढ आणि आनंदाचे जावो हीच प्रार्थना.  ३१ डिसेंबरच्या पूर्व संध्येला मी देखील कहीतरी संकल्प केलेला आहे तुम्हीपण करा, स्वप्न पहा, आणि वाटचाल करा..... चला तर भेटूया असेच कधीतरी आता पुढच्या वर्षी! ....  नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..... 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture