स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२ भारतीय स्वातंत्र्याला आपणास ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपासून सुरु झाला? व कधीपर्यंत सुरु राहील? भारतीय स्वातंत्र्याचे लवकरच ७५ वर्षे पूर्ण होतील. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश शाशनापासून मुक्त झाला होता. स्वतंत्र मिळाल्यापासून,आपण ७५ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. आपण सर्वजण या आनंदमयी दिवसाचे स्वागत करण्याकरिता उत्सुक आहोत. हे वर्ष आपल्या सर्वांकरिता वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. हे वर्ष आपल्याकरिता गौरवांकित वर्ष आहे तसेच ऐतिहासिक व महत्वपूर्ण देखील आहे. असा हा अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सर्वांवर सोपविलेली आहे हे आपले भाग्य आहे. असा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांपर्यंत सुरु राहणार आहे. ७५ आठवड्यांचा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७८ व्या स्वतंत्र दिनी समापन होईल. ...