पोस्ट्स

#विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl

इमेज
 आजची विषकन्या /Vishkanya #विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl      वैदिक साहित्य, लोक कथा आणि इतिहासानुसार ज्या स्त्रीला अगदी लहानपणापासूनच थोडे थोडे विष देऊन त्यांना विषच्या आदी बनवले जाते त्यांना विषकन्या संबोधले जाते. अश्या स्त्रियांना विषारी वृक्ष, पशु व पक्षीसोबत राहण्याकरिता सवय लावली जायची. त्याचसोबत स्त्रियांमध्ये असलेले गुण जसे कि, संगीत, नृत्य, गायन यांचेही शिक्षण दिले जायचे. तत्कालीन राजांद्वारे या विषकन्येचा वापर करून राज्याचे अंतर्गत किंवा बाहेर असलेले शत्रू राजांना छळ करून मृत्यू  देण्याकरिता अश्या विष कन्यांना सर्व प्रकारचे छळ कपटाच्या विद्येमध्ये पारंगत केले जायचे. सर्व प्रकारच्या शत्रू राजांच्या शरीरात आपले विष पोचवण्याकरिता सर्व विषकन्या पारंगत होत्या. जसे कि, सांगितले जाते कि, विषकन्यांचा श्वास देखील विषारी असायचा. अश्या विषकन्यांचा श्वास जर कोणी ग्रहण केला तर शत्रू थोड्याच वेळात आजारी पडायचे किंवा त्यांना मृत्यू यायचा.  विषकन्या आपल्या मुखात विष ठेऊन चुंबन घेण्याच्या बहाण्याने शत्रूच्या शरीरात विष टाकायचे. विषकन्येची ...

खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi

इमेज
खान्देशचा तगतराव  खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi                     तिकडे गावाकडे खान्देशात गेलेलो होतो, सालाबादप्रमाणे त्या वर्षीही गावाकडे तगतरावांची मिरवणूक निघते आणि हे तगतराव यात्रेलाच असतात. आता तगतराव म्हणजे काय हो असा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. तर तगतराव म्हणजे गावामध्ये यात्रेच्या पहिल्याच दिवशी तमाशा असतो त्या तमाश्यामधील कलाकार यांची मिरवणूक पूर्ण गावातून काढली जाते. त्यात स्त्री कलाकार देखील असतात आणि त्या तमाशा मंडळात काम करणाऱ्या स्त्री पुरुष कलाकारांची जेव्हा मिरवणूक काढली जाते त्यावेळी गावातील खूप सर्व मंडळी मुले माणसे पुरुष स्त्रिया या सर्व उत्सवात सामील होतात. यालाच म्हणतात तगतराव.  खान्देशचा तगतराव /Tagatrao in Khandesh/Khandeshi                        तर मंडळी, मी पण या तगतरावच्या उत्सवात सामील झालो, आणि इतर मुलांप्रमाणे मी पण त्या सुंदर स्त्रियांकडे एकटक पाहून वेगवेगळे विचार करू...

Sankalp/संकल्प/31December

इमेज
संकल्प  आज दिनांक ३१/१२/२०१९,  लक्षात आले असेलच आज ३१ डिसेंबर!  नेहमीप्रमाणे तयारी करून मी  माझ्या मोटर सायकलने रस्त्याने भरधाव निघालो, सकाळचे ८.४५ झाले होते, पण काय मोठे आश्चर्यच घडले. रस्ता कसा सामसूम होता.  मनात वेगळेवेगळे विचार सुरु झालेले होते. एकटाच होतो, डिसेम्बरची थंडी कमालीचं गारठा देत होती.   मनात विचार येत होता कि, काय आज मी पण ३१ डिसेंबर हा दारू पिऊन साजरा करावा?   कि, मग मी पण कुठेतरी पार्टीत जाऊन किंवा शेतात जाऊन एकदम झिंगाट व्हावे काहीच सुचत नाही. आज शहरात किंवा गावात सुद्धा पब, बार, मॉल सगळं अगदी एखाद्या नवीन नवरीप्रमाणे सजून तयार असतील. कोणी कार्यक्रमांची जय्यत तयारी केलेली असेल, तर कोणी हॉटेलमध्येच सगळी तयारी केलेली असेल. आणि जास्त धमाल करण्याकरिता तर काही ठिकाणी नवीन नवीन ऑफर देखील आलेल्या असतील. मला पण या गोष्टींचं खूपच आकर्षण वाटते. खरंतर वर्ष २०१९ हे मला फारच वाईट गेले, काय मी माझ्या नाशिबाला दोष देऊ कि मग नेहमीप्रमाणे फक्त लढतच पुढे वाटचाल करत राहू? जस जसे वर्ष जात आहेत तशी ती वर्ष मला माझ्या एका वर्षाने वयस्कर...

#अस्तंभा - एक थरार/#Astamba/Astambha Rushi/#Astamba rushi yatra

इमेज
अस्तंभा - एक थरार अनुभव  मित्रांनो, मी स्वतः नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असतो. साहजिकच, नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास असल्यामुळे अस्तंबा ऋषी यात्रेची बऱ्यापैकी माहिती मला आहे. अस्तंबा हे एक सातपुडा पर्वतराजीतील बसलेले छोटेसे देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी साधारणतः लक्ष्मीपूजनाच्या २ ते ३ दिवस अगोदर अस्तंबा ऋषी देवस्थानावर यात्रा असते. या यात्रेसाठी हजारो भाविक पायी अस्तंब्याचा डोंगर चढण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, व गुजरात इथून भाविक हजारोंच्या संख्येने हजर असतात.  असेल साधारणतः ५ -६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्हाला देखील फारच हाऊस असल्यामुळे आम्ही साधारण ४ ते ५ मित्रानी ठरवले कि आपणही अस्तंब्याला जाऊया मग काय आमची जय्यत तयारी सुरु झाली. तसे आमचे बरेचसे मित्र हे तळोद्यात असतात आणि अस्तंब्याची यात्रा हि तळोद्यापासूनच खरी सुरु होते. त्यामुळे मला जास्त ताणच नव्हता. मग ठरल्याप्रमाणे मी तळोद्यात आलो सर्व तयारी उरकून आम्ही संध्याकाळी साडेचार नंतर प्रवासाला सुरुवात केली. तळोद्यापासून आम्हाला पायी प्रवास करायचा होता. प्रवास रात्रभर होणार होता आणि थंडीचे प्रमाणही वाढलेल...

#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या

इमेज
सोनेरी कोंबड्या #Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या (आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...) ......... मग खूप वर्ष उलटलीत मी तो विषय विसरलो होतो पण अचानक हातात एक पुस्तक आले आणि मला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली आणि उत्तरही मिळाले.......  (उत्तरार्ध ) .......एके दिवशी सहजच फिरायला निघालो मधेच रस्त्यात एक लायब्ररी दिसली आणि शेजारीच एक  पुस्तकांचे भव्य प्रदर्शनही  भरले होते. मला पूर्वीपासूनच  पुस्तके चाळन्याची सवय होती आणि त्यावेळी मनोरंजनासाठी आतासारखे मोबाइल पण नव्हते, खूपच छान आणि मनोरंजन करणारे कलर आणि स्मार्ट टीव्ही पण नव्हते त्यामुळे एकतर सिनेमा/ नाटक पाहणे, फिरायला जाणे, किंवा उरले सुरले तर वर्तमान पत्रे वाचणे आणि पुस्तके वाचत राहणे एवढाच पर्याय  आमच्यासमोर होता आणि तीच मनोरंजनाची साधने होती. मग त्या लायब्ररीत अचानकच एका पुस्तकावर  पडली म्हणून मी ते पुस्तक ताबडतोब अघाश्यासारखे वाचायचे ठरवले आणि ते पुस्तक लायब्ररीत  नोंद करूंन घरी नेले. त्या पुस्तकाशी माझे बालपणाचे क्षण किंवा आठवणी जुडलेल्या होत्या ...

#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या

इमेज
सोनेरी कोंबड्या   (आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...)          असेल साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट,   मी खूप लहान होतो, आमचे आजी आणि बाबा हे त्यावेळी टोपलीमध्ये फळे विकण्याचे काम करायचे. त्याकरिता त्यांना पहाटे उठून मार्केट मध्ये जाऊन फळे विकत घ्यावी लागायची. मी लहान असल्यामुळे मला मार्केट काय असते, फळे कशी विकत घेतात, बाजारात गर्दी असते ते सगळं पाहायची मनापासून खूप उत्सुकता होती.  आजीकडे तसे वातावरण छान होते जसे  गावात असते ना अगदी तसेच. म्हणजे आजीने कोंबड्या पाळलेल्या होत्या,  बकऱ्या पाळलेल्या होत्या, आणि एक खंड्या नावाचा कुत्रा पण होता. मला माहीत नाही पण मी जेवायला बसलो कि तो कुठे का असेना आपोआप येऊन जायचा त्याला आपोआपच समजायचे कि, मी जेवत आहे मग तो पळत पळत यायचा आणि त्याची इवलीशी शेपूट हलवून जणू माझ्याकडे भाकर मागायचा. आजीच्या हातची बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा माझा आवडीचा होता.      एके दिवशी, मी सकाळी सकाळी न्याहारी केली आणि मला बाजार पाहायचा होता म्हणून आजी आणि बाबा...

#Mrutyupurvichi Suchana, #मृत्यूपूर्वीची सुचना

इमेज
मृत्यूपूर्वीची सुचना  सगळं काही ठीक ठाक सुरु होते, .... सुरुचीचे जीवन अगदी आनंदात जात होते ती तिच्या कॉलेजच्या मित्र आणि मैत्रिणिसोबत खूप आनंदात तिचा दररोजचा वेळ जात होता.              दररोज ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून योगासने करून देवाची पाठपूजा केल्याशिवाय बाहेर जात नव्हती, अशीच एके दिवशी जात असताना अचानकच तिची आवडीची "मनी" तिच्या पायात नेहमीपेक्षा जास्त लोळण घ्यायला लागली. जणू ती मुक्या शब्दात तिला सांगत होती कि, "अगं  सुरूचे, तू जाऊ नकोस" पण कदाचित "मनी "चे शब्द तिच्या लक्षात येत नव्हते. या अश्या वेगळेपणामुळे तिच्या मनात सारखी पाल चुकचुकत होती माहित नाही पण काहीतरी वेगळे घडत आहे हे तिच्या लक्षात यायला हळूच सुरुवात झाली होती. तरीही ते सर्व दुर्लक्ष करून ती आज थोड्या वेळात व किंबहुना विचारात तशीच कॉलेजला गेली.            पुन्हा असेच काही दिवस गेलेत, तिला निसर्गाचे थोडे जास्तच संकेत मिळायला लागलेले होते.  तिचे मन काहीतरी शोधात होते परंतु तिचा शोध अजून पूर्ण झालेला न...