#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या



सोनेरी कोंबड्या

#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या
(आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...)
......... मग खूप वर्ष उलटलीत मी तो विषय विसरलो होतो पण अचानक हातात एक पुस्तक आले आणि मला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली आणि उत्तरही मिळाले....... 
https://tickutalk.blogspot.com/2019/11/soneri-kombdya-golden-hens.html
(उत्तरार्ध )


.......एके दिवशी सहजच फिरायला निघालो मधेच रस्त्यात एक लायब्ररी दिसली आणि शेजारीच एक  पुस्तकांचे भव्य प्रदर्शनही  भरले होते. मला पूर्वीपासूनच  पुस्तके चाळन्याची सवय होती आणि त्यावेळी मनोरंजनासाठी आतासारखे मोबाइल पण नव्हते, खूपच छान आणि मनोरंजन करणारे कलर आणि स्मार्ट टीव्ही पण नव्हते त्यामुळे एकतर सिनेमा/ नाटक पाहणे, फिरायला जाणे, किंवा उरले सुरले तर वर्तमान पत्रे वाचणे आणि पुस्तके वाचत राहणे एवढाच पर्याय  आमच्यासमोर होता आणि तीच मनोरंजनाची साधने होती. मग त्या लायब्ररीत अचानकच एका पुस्तकावर  पडली म्हणून मी ते पुस्तक ताबडतोब अघाश्यासारखे वाचायचे ठरवले आणि ते पुस्तक लायब्ररीत  नोंद करूंन घरी नेले. त्या पुस्तकाशी माझे बालपणाचे क्षण किंवा आठवणी जुडलेल्या होत्या शिवाय माझ्या काही बालपणीच्या अनुत्तरित प्रश्नांची  उत्तरे देखील लपलेली होती.
https://tickutalk.blogspot.com/2019/11/soneri-kombdya-golden-hens.html

जो प्रश्न मी स्वतःच विसरलेलो होतो, नेमका त्याचे उत्तर त्याच पुस्तकात मला मिळालेले होते. 

 . . . . . . . . .  तर त्या पॉलिशवाल्या कोंबड्या त्याकाळी  इतक्या महाग का होत्या? 

मी  जे वाचले ते अगदी थक्क करणारे होत.  

 

त्या कोंबड्यांवर पॉलिश येण्याकरिता त्यांना खूप मोठ्या दिव्यातून जावे लागत होते.  या नाट्याची सुरुवात अशी होते, कोंबड्याना अंड्यावर बसवून  पिलू बाहेर येण्याची  वाट पाहायची. अंड्यातून १० ते १२ पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना साधारण २ ते ३ महिन्यापर्यंत नर व मादी समजेल अश्या पद्धतीने मोठे होऊ द्यायचे मग त्या १० ते १२ पिल्लांमधून जास्त सशक्त असे फक्त २ ते ३ पिल्ले वेगळे काढायचे व त्यांचे वेगळ्या पद्धतीने संगोपन करायचे. नुसते संगोपनच नाही करायचे तर त्यांचे दाणा पाणी देखील वेगळ्या प्रकारचे होते. मग बाकी उर्वरित पिल्लांचे काय? तर उर्वरित पिल्लाना त्याकरिता बळी जावयाचे होते. 
https://tickutalk.blogspot.com/2019/11/soneri-kombdya-golden-hens.html

तर ते जंगलातील लोक, एक खूपच जास्त विष असलेला सर्प शोधायचे,  तो सर्प पकडून त्याच्या विषासाठी  साठी त्याला डांबून ठेवायचे. मग त्या उरलेल्या पिल्लांपैकी प्रत्येक एका पिल्लाला त्या विषारी सर्पाचा दंश करण्याकरिता सोडून दिले जायचे. सर्पदंश झाल्यावर ते पिल्लू हळू हळू मरायाचे ते मेलेले विषयुक्त पिल्लाला बाजरी किंवा गव्हाच्या पिठात बारीक कुटून ते बाजरीचे पीठ त्या  वेगळ्या काढलेल्या पिल्लाना खाऊ घातले जायचे आणि त्यामुळेच त्यांच्या पिसांवर कालान्तराने सुंदर चकाकी यायची आणि म्हणूनच त्या कोंबड्या इतर कोंबड्यांपेक्षा वेगळ्या आणि महाग का होत्या ते मला आज कळले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture