स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२

भारतीय स्वातंत्र्याला आपणास ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. 

Independence Day/स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022/tickutalk


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपासून सुरु झाला? व कधीपर्यंत सुरु राहील?

            भारतीय स्वातंत्र्याचे लवकरच ७५ वर्षे पूर्ण होतील. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश शाशनापासून मुक्त झाला होता. स्वतंत्र मिळाल्यापासून,आपण ७५ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. आपण सर्वजण या आनंदमयी दिवसाचे स्वागत करण्याकरिता उत्सुक आहोत. हे वर्ष आपल्या सर्वांकरिता वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. हे वर्ष आपल्याकरिता गौरवांकित वर्ष आहे तसेच ऐतिहासिक व महत्वपूर्ण देखील आहे.  असा हा अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सर्वांवर सोपविलेली आहे हे आपले भाग्य आहे. असा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांपर्यंत सुरु राहणार आहे. ७५ आठवड्यांचा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे  दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७८ व्या स्वतंत्र दिनी समापन होईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022

           भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे काही एका दिवसांचा परिणाम नसून हे दशकाचे श्रम आहे, ज्यात आपले देशाचे लाखो वीर सुपुत्रांचे रक्त सांडले तसेच लाखो स्वातंत्र्य संग्रामी यांनी  बलिदान दिलेले आहे. 

            वर्तमान लोकतांत्रिक देशांमध्ये भारत हा एक महान व जगातील सर्वात मोठ्या लोकतांत्रिक देशांमध्ये गणला जातो. येणाऱ्या काळात आपण अधिक वेगाने पुढे जाऊ आणि त्या अनुषंगाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि संविधान निर्मात्यांनी पाहिलेली स्वप्नेही साकार होतील. आजची पिढी हि देखील सक्षम, स्वावलंबी व सामंजस्यपूर्ण बनू पाहत आहे. 
                       हे देखील वाचा : #टॉयलेट - एक वैचारिक साधन

            संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणाऱ्या आणि सर्वांच्या  करणाऱ्या हाजारो वर्ष जुन्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे आपण वारसदार आहोत हे आपण प्रत्येक क्षणी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो जागतिक रित्या प्रेरणादायी ठरेल आणि जगाचे नेतृत्व करण्यासाठी सुसज्ज असेल. हे थोडेसे अवघड वाटते परंतु अशक्य  तरी नाही. हि सर्व आव्हाने पूर्ण  आपणांस संघटित होणे आवश्यक आहे. हीच इच्छाशक्ती जागृत होण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची प्रत्येकाने ईच्छा तर ठेवलीच पाहिजे, पण त्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्नही व्हायला हवेत. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे देशातील तसेच देशाबाहेरील सर्व समस्या दूर होतील. 

७५ वर्षात देशाने काय साध्य केले?/ ७५ वर्षात आपण काय कमावले, काय गमावले?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022            
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश शेकडो  वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हापासून देशाने सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, लष्करी, क्रीडा आणि तांत्रिक क्षेत्रात विकासाच्या प्रवासात महत्वपूर्ण ठसा उमटवला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे  मजबूत व भक्कम राष्ट्र म्हणून पाहतो. ७५ वर्षांच्या या विकास प्रवासात नवीन विक्रम झाले आहेत. गेल्या ७५ वर्षात देशातील अंतर्गत समस्या आणि आव्हानांमध्ये देशाने निश्चितपणे काहीतरी साध्य केलेले आहे. 

            भारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते कोणत्या स्वरूपात आहे? राज्यघटनेतील आदर्श आदर्श देशाचे दर्शन आपण किती प्रमाणात साकारू शकलो आहोत? आपल्या पूर्वजांच्या स्वप्नातील तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत आपण साकारला आहे का? प्रश्न असा आहे कि देश म्हणून आणि व्यक्ती म्हणून आपण आज कुठे उभे आहोत? स्वातंत्र्या मिळाल्यापासून एवढ्या वर्षात आज आपण काय कमावले आणि काय गमावले हे देखील बोलणे गरजेचे आहे. 

            भारताला स्वातंत्र्य हे फाळणीतून मिळाले आणि फाळणीतून पाकिस्तान हा नवा देश अस्तित्वात आला. यानंतर आपणास काश्मीर आणि आकसाई चीन मधील आपली जमीन गमवावी लागली. देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागात निर्माण झालेल्या नव्या देशांमुळे भारताला आपली लोके आणि जमीन गमवावी लागली. तेव्हापासून भारत आपल्या सीमेचे रक्षण करत आहे. त्यानंतर देशात आलेली अंतर्गत आव्हाने आणि सांप्रदायिकता आणि सलोखा बिघडविण्याच्या कुटील युक्त्या यांना प्रत्युत्तर देत भारताने विविधतेत एकता आणि धर्मनिरपेक्षतेची भावना  टिकवून ठेवली. 

                                                  हे देखील वाचा : #विषकन्या/#Vishkanya/#Snake Girl

            भारत हे लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. लोकशाही संस्थेवर लोकांचा विश्वास आहे. भारतीय लोक त्यांच्या आवडीचे सरकार निवडू शकतात. भारताच्या लोकशाहीत लोक महत्वाचे आहेत हा भारताचा विजय आहे. 
भारतात गरीब आणि दुर्बल घटकांकरिता सरकारने लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. योजनांचा लाभ गरीब आणि दुर्बल घटकांना देण्यात आला आहे. सामान्य माणसाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, यासारख्या कार्यक्रमांनी सर्वसामान्यांना सक्षम केले आहे. या योजनांनी विकासाचा वेग वाढवला मात्र सरकारच्या काही योजनांची पूर्णतः अंमलबजावणी झाली नाही हे एक सत्य आहे. विकासयोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करूनही देशातील गरिबी आणि मागासलेपणा दूर झालेला नाही. 

            आज भारत हि जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्याने झालेला आहे. आर्थिक, लष्करी आणि अवकाश क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. भारताकडे जगातील चवथ्या क्रमांकाचे सैन्यबळ आहे. लष्करी क्षेत्रात भारत महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. आपल्या सैन्याकडे आज अण्वस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत, तसेच अंतराळ क्षेत्रात भारताने नवीन विक्रम केलेले आहेत. मंगळ मोहिमेच्या यशामुळे आणि त्याच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या क्षमतेमुळे भारत हा अवकाश क्षेत्रात विशेष कौशल्यं असलेला मोजक्या देशांपैकी एक आहे. आयटी क्षेत्रात देश अग्रेसर आहे त्यामुळे देश महासत्ता होण्याच्या दारात पोचला आहे. 

                                         हे देखील वाचा :  #सोनेरी कोंबड्या #Soneri Kombdya #Golden Hens

            आज भारताकडे जगाला देण्यासारखे बरेच काही असूनही, सामाजिक आणि नैतिक मूल्यांची घसरण झाल्याचे जाणवते. व्यक्तीपासून, समाज, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात मूल्यांची घसरण दिसून येते. सत्ता आणि पैसा कमविण्याच्या लालसेपोटी लोक भ्रष्ट आणि नैतिकदृष्टया कमकुवत होत आहेत. 

            राजकारणात एक काळ असाही होता, जेव्हा मंत्री, झालेल्या अपघाताची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा देत असत. भ्रष्टाचारात नावे आल्यानंतर नेते पदे सोडत असत. पण आज सत्तेत राहण्यासाठी सर्व प्रकारची तडजोडी केल्या जातात आणि डावपेच अवलंबले जातात. नेतेपदाची सुरुवात झाल्यापासून गडगंज संपत्ती जमा केली जाते. मुळात नेतेपदच कमाईचे साधन तसेच सत्तेचे साधन होऊन बसले आहे. नैतिक अधःपतनाला नेतेच जबाबदार नसून सर्वच क्षेत्रात नैतिक मूल्यांची घसरण झाली आहे. यासाठी कोणाला एकाला जबाबदार धरता येत नाही. 

            एक चांगला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला पाहिजे, सर्वानी पुढे यायला पाहिजे. हि जबाबदारी ओळखण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांपेक्षा चांगला पर्व नाही. या संधीचा सदुपयोग करून आपल्या शुभ संकल्पाने यशाची नवी गाथा लिहूया....  जय हिंद, जय भारत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध, #अमृत महोत्सव म्हणजे काय?, #स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी, #स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शालेय उपक्रम, #स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र, #स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, #स्वातंत्र्याची 75 वर्षे निबंध मराठी, #स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कविता मराठी, #हम अमृत महोत्सव क्यों मनाते हैं? #आजादी का अमृत महोत्सव कहां मनाया जाता है?, #आजादी का अमृत महोत्सव विकिपीडिया क्या है?, #अमृत ​​महोत्सव का विजेता कौन है?,हर घर तिरंगा, #amrut mahotsav' website, #Amrit Mahotsav, #75 Amrut Mahotsav logo, #Azadi Ka Amrut Mahotsav PDF, #Azadi Ka Amrit Mahotsav, #Azadi ka Amrit Mahotsav certificate, #amrit mahotsav certificate download

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture