Jay adivasi/Jagtik Adivasi Din/9 Aug/World Tribal Day/ जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट

जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट

जागतिक आदिवासी  दिवस म्हणजे काय? त्यामागील मूळ संकल्पना काय आहे?

दुसऱ्या महायुद्धाचे चटके सहन केल्यानंतर, जगात सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, आतंकवाद हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर  झाल्यात. या सर्व विचारांनुसार २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघात एकूण १९२ देश सदस्य असून त्यात भारताचा देखील समावेश होतो. स्थापनेचे ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात आले कि, २१व्या शतकात आजदेखील जगातील बहुतांश आदिवासी समाज उपेक्षित जीवन जगात आहे. गरिबी, अशिक्षितपणा, मजुरी, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी अश्या अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला होता. या विळख्यातून बाहेर पडणे आदिवासी समाजाला अशक्य होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून, सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा सर्व समाविष्ट देशाना केली. त्यानंतर सर्व जगात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शाषन चालविण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, संविधान लिहिले तसेच ते २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण २२ भाग, १२ अनुसूची, आणि ३९५ अनुच्छेद समाविष्ट करण्यात आलेत. यात सर्वात जास्त अनुच्छेद आदिवासी समाजासाठी आहेत. 

आदिवासी म्हणजे काय?

आदिवासी हा शब्द संस्कृत शब्द "आदि + वासी" या शब्दाच्या फोडीवरूनच आपल्या लक्षात येते कि, आदिवासी म्हणजे येथील मूळ निवासी होत. 

विशिष्ट भूप्रदेश, सामान बोलीभाषा पण लिपी नाही, निसर्गावर अवलंबून असलेली अशी वेगळी जीवन पद्धती, साधी अर्थव्यवस्था, सामाजिक एकोपा, इत्यादी वैशिष्ट्ये या समाजात दिसून येतात. 

महाराष्ट्रात मुख्यतः १४ जिल्ह्यात आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड, आणि अमरावती हे जिल्हे, समावेश होतो.  महाराष्ट्रात उत्तर भागात असलेल्या धुळे, नंदुरबार, आणि जळगाव या जिल्ह्यांचा खान्देश या विभागात समावेश होतो. याच खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील असलेला सातपुडा पर्वत म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नैसर्गिक सीमारेषा आहे. या सातपुड्याच्या पर्वत रांगेत मुख्यतः आदिवासी जमातीची  लोकवस्ती आहे. या भागात प्रामुख्याने पावरा, तडवी, पाडवी, भिल्ल, बारेला, मावची, कोकणी, या आदिवासी जमाती आढळतात. 

आदिवासी समस्यांच्या  विळख्यात 

आदिवासी हा भारताचा आदिम घटक आहे हे सर्वानी मान्य करायला हवे तसेच त्याचं स्वतःच एक अस्तित्व आहे. आजही आदिवासींमध्ये चांगल्या प्रथा आहेत. सामूहिक जीवनपद्धती, सामूहिक निर्णय, जंगलाचे रक्षण करणे, आवश्यक तेवढेच पिकविणे, मदत करणे, अश्या एक ना अनेक गोष्टी आदिवासींकडून शिकण्यासारक्या आहेत. आदिवासी समाजाने कधीच निसर्गाविरुद्ध पाऊल टाकले नाही. आदीवासी समाज निसर्गाच्या नियमाप्रमाणे जीवन जगत आहे. म्हणून इतरांनीही निसर्गाला समजणे आवश्यक आहे. आदिवासींनी खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण केले, निसर्गाचा समतोल राखला. आदिवासींना जंगलातील वनस्पतींचे वापराबद्दल ज्ञान आहे, ते जतन करावयास हवे. त्यांचे सण उत्सव हे निसर्गाला  कोणतीही हानी न पोचता  साजरे केले जातात. तरीही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज विविध समस्यांनी त्रस्त आहे. 

विविध प्रकारचे जंगल कायदे इंग्रजानी केलेत, त्यामुळे जंगलांवरील आदिवासींचे हक्क आपोआपच हिरावले गेले, या विविध प्रकारच्या जंगल कायद्यांमुळे आदिवासींना त्यांच्या पारंपरिक हक्कानं मुकावे लागले. फूट पाडून काही व्यापारीनी त्यांचे जंगल व जमिनी या उदर्निर्वाच्या साधनानं बळकावलीत. त्यांच्या निरक्षरतेचा,  अज्ञानाचा, दुबळेपणाचा फायदा सावकार, कंत्राटदार, दलाल यांनी पुरेपूर घेतला. या प्रवृत्तीचा परिणाम म्हणून आत्यंतिक दारिद्र्य, वेठबिगारी, स्थलांतर, कुपोषण आणि बालमृत्यू  आणि आरोग्य असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. 

मुळात आदिवासी समाज हा जंगलात राहत होता. त्यामुळे देशाचा विकास होत असताना, देशाच्या विकासासाठी सर्वात जास्त किंमत चुकविली असेल तर ती आदिवासिनीं. कारण देशाचा विकास करत असताना कोळश्याच्या खाणी आणि इतर खनिजाच्या खाणींमुळे तसेच जंगले आणि त्यावर आधारित वनोत्पादने हि संसाधने हि आदिवासी भागातच आहेत. त्यामुळे भारतात सर्वात जास्त विस्थापित गट हा आदिवासींचाच दिसून येतो व आदिवासीच जास्त विस्थापित झालेले दिसतात. 

आदिवासींच्या पुनर्वसनामुळे त्यांची पारंपरिक सामूहिक जगण्याची पद्धत व सांस्कृतिक जीवन उध्वस्त होते. बाजारू शेतीच्या अयोग्य नियोजनामुळे आदिवासींचे जगणे अवघड होत आहे. त्यातूनच मग भूकबळी, कुपोषण यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पैसे मिळविणे हि मुख्य गरज निर्माण झाली.  बांधकाम, शेती, उद्योग व्यवसाय  यासाठी सर्वात स्वस्त मजूर असेल तर तो फक्त आदिवासीच. एखादा एजंट पाठवून थोडेसे पैसे उचल देऊन त्यांना गाडीत कोंबून कामावर न्यायचे.  काम झाल्यावर हाकलून  देणे, मजुरी न देणे, दिलीच तर कमी प्रमाणात  देणे इत्यादी गोष्टींमधून आदिवासी भरडला जात होता. 
 
 
स्वातंत्र्यानंतर शासनाने आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक सवलती देऊ केल्यात. आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्या इत्यादी मार्गाने सरकारने प्रयत्न केले आहेत, असे असूनही आदिवासींची शैक्षणिक परिस्थिती अजून पाहावी तशी सुधारलेली नाही. मैदानी प्रदेशातील इतर लोकांच्या सहवासामुळे प्रगत झालेले समाज सोडलेत तर, दारिद्र्यामुळे शिक्षण नाही आणि शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्यातून सुटका नाही याच दुष्ट चक्रात आदिवासी अडकला आहे. 

कुपोषण, बालमृत्यू आणि साथीच्या आजारांनी विळखा घातलेल्या आदिवासींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आदिवासींची संस्कृती, जीवनपद्धती आणि राहणीमान यांना अनुकूल आरोग्य सेवा सक्षम करणे अधिक गरजेचे आहे. 

उपाय योजना 

प्रत्येक गावात शाळा, गावापर्यंत रस्ता, सार्वजनिक वाहतुकीची सोय, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि उत्तम आरोग्य सुविधा या मूलभूत सोयी प्रत्येक आदिवासी गावापर्यंत व पाड्यापर्यंत असायलाच हव्यात. कुटुंबातील कोणीही रोजगारासाठी गाव सोडता कामा नये, यासाठी गावातच वर्षभर रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. 

पेसा आणि वनहक्क कायद्यामुळे मिळालेल्या अधिकारांचा  उपयोग आता आदिवासी गावांना स्वतालाच विकास आराखडा आखण्यासाठी करता येणार आहे. वनहक्क कायद्यात आता आदिवासींना जंगलाची मालकी मिळाली. 
वनहक्काबरोबरच वनांमधील संपत्तीचे जातं आणि वापर करण्याची जबाबदारीही आता ग्रामस्थानची आहे. 

आदिवासींमधील आधुनिकता.. 

आता अलीकडेच आदिवासी समाज जागृत झाल्यामुळे काही गावांमध्ये आर्थिक प्रगती दिसून येते. आदिवासी समाजातील  तरुण हे शिक्षित होऊन स्वतःच्या तसेच समाजाच्या आर्थिक प्रगतीमध्ये साथ देत आहेत.  जेथे कोठे शाळा उपलब्ध नसतील अश्या विभागातील लहान मुले तसेच महाविद्यालयातील मुले हि उपलब्धतेनुसार आश्रम शाळेत शिक्षण  घेत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजातील बरेच असे काही विद्यार्थी हे वरिष्ठ अधिकारी पद भूषविताना दिसतात. कोणी आय ए एस बनत आहेत तर कोणी आय पी एस बनत आहेत. नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पद भूषविणारे मा. डॉ.  राजेंद्र भारूड यांचे नाव घेता येईल. 

आदिवासी आता आधुनिकतेकडे वळत असून शेती देखील आधुनिक पद्धतीने केली जात आहे. त्यात सरकार आदिवासींना लाभार्थी बनवून मदत करत आहेत. काही योजना देखील सरकारकडून अनुदानित तत्वावर लागू करण्यात आल्या आहेत. नोकरीत आरक्षण असल्यामुळे काही आदिवासी नोकरी करताना दिसत आहेत त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. चारचाकी तसेच दुचाकी वाहनांचा वापर आदिवासी समाज करताना दिसत आहे. आधुनिकतेचा अवलंब करून टीव्ही संगणक,  मोबाइलला,लॅपटॉप इत्यादी संसाधनांचा वापर करताना आदिवासी समाज दिसू लागला आहे.  आदिवासींना त्यांचे हक्क आता कळू लागले आहे. आदिवासींमध्ये जो समाज शिक्षित झाला त्याची प्रगती दिवसेंदिवस होताना आपण पाहत आहोत. त्यामुळे मुख्य प्रवाहात आता आदिवासी समाज समाविष्ट होत आहे.  आदिवासी समाज हा आता हळूहळू आधुनिकतेकडे वळू लागला आहे...... 

९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

 मित्रानो, तुम्हाला हा लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा... आणि काही दुरुस्त्या असल्यास त्याही  कमेंट व सूचना असल्यास  करून सांगा. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#9 अगस्त विश्व आदिवासी दिवस क्या है?, #9 अगस्त को कौन सा दिवस मनाया जाता है?, #विश्व आदिवासी दिवस की स्थापना कब हुई?, #विश्व आदिवासी दिवस कैसे मनाया जाता है?, #जागतिक आदिवासी दिन माहिती, #आदिवासी माहिती, #आदिवासी या शब्दाचा अर्थ काय आहे, #आदिवासी देव, #आदिवासी भाग, #भारतात कोणत्या राज्यात आदिवासी समाज आढळतो, #भारतीय संविधानानुसार आदिवासी कोणत्या नावाने ओळखले जातात, #सातपुडा आदिवासी जमाती, #9august आदिवासी दिवस क्यों मनाया जाता है?, #आदिवासी दिवस कब मनाया जाता है?, #विश्व आदिवासी दिवस कब लागू हुआ?, #9 अगस्त को कौन सा त्यौहार है?, #श्व आदिवासी अधिकार दिवस, #विश्व आदिवासी दिवस 2021 की थीम, #विश्व आदिवासी दिवस बैनर, #9 अगस्त विश्व आदिवासी दिवस फोटो, #विश्व आदिवासी दिवस क्यों मनाया जाता है, #भारत में आदिवासी दिवस कब मनाया जाता है, #विश्व आदिवासी दिवस पर भाषण pdf, #विश्व आदिवासी दिवस पर भाषण. 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture