Drones
ड्रोन (Drones)
मित्रानो, आज आपण ड्रोन बद्दल संक्षिप्त रूपात जाणून घेणार आहोत. वेळ आणि काळ जसा बदलत गेला त्याच अनुपात मध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहे, ज्यात ड्रोन देखील समाविष्ट आहेत.
ड्रोन ला लहान्यांपासून मोठांपर्यंत सर्वजणांनी पाहिलेले असेल. परंतु आपल्याला नेमके माहित नाही कि ड्रोन काय असते? किंवा ड्रोन कसे कार्य करते?, किंवा ड्रोन चा मानवजातीमध्ये कश्याप्रकारे वापर केला जातो?, ड्रोन चे उपयोग कुठे कुठे केले जातात, कोणत्या क्षेत्रात केले जातात?
हे देखील वाचा :-
Elon Musk, his Tesla cars and his entry into India/ एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश
Jay adivasi/Jagtik Adivasi Din/9 Aug/World Tribal Day/ जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट
जसे कि आपण जाणतात, मानव जातीला पूर्वीपासून उडण्याचे वेड होते त्याकरिता वेगवेगळे प्रयोग देखील केले गेलेले होते नंतर कालांतराने मानव विरहित यान किंवा ड्रोन उदयास आलेत. वापरानुसार ड्रोनचे आकार व वजन वेगवेगळे असू शकतात. ड्रोन हे छोट्या स्वरूपातील व उडणारे व रिमोट द्वारे नियंत्रित केले जाणारे एकप्रकारचे रोबोट्सच असतात.
मानवरहित संचालन असल्यामुळे ड्रोन चा जास्तीत जास्त वापर सैन्यदलामार्फत केला जातो. युद्धात किंवा टेहळणी कार्याकरिता ड्रोन चा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पायलट च्या जीवितास धोका नसतो. तसेच ड्रोन च्या उड्डाणं साठी पारंपरिक इंधनाचा वापर केला जात नसल्यामुळे होणाऱ्या खर्चात देखील मोठ्या प्रकारे बचत होते. ड्रोन हे एकप्रकारचे उडणारे रोबोटच असल्यामुळे ते न थकता उडू शकतात.
आता तर ड्रोन चा नागरी वापर देखील करण्यात येत आहे. उदा. शोधकाऱ्याकरिता, बचाव कार्याकरिता, वातावरण बदलाशी संबंधित, दळणवळण करिता, फोटोग्राफिकरीता, विडिओ शूटिंग करिता, लग्नात, किमती वस्तूंच्या पहाऱ्यासाठी, अग्निशमन दलाकरिता, शेती संबंधित कार्याकरिता तसेच होम डिलिव्हरी करिता.
ड्रोन म्हणजे काय ?/ ड्रोन काय असतं? (What is Drone? in Marathi) :-
ड्रोन या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. ड्रोन या शब्दाचा प्रयोग विविध अर्थामध्ये केला जातो. विविध कार्याकरिता उपयोगात आणले जाणारे व विविध आकार असणारे मानवरहित विमान (Unmanned Aerial Vehicle) किंवा (Unmanned Aircraft Systems) म्हणजेच ड्रोन होय.ड्रोन ची सामान्य रचना कशी असते?
ड्रोन ला आपण एकप्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणू शकतो. अशी वस्तू किंवा उडणारे रोबोट जे आपल्या हातातील रिमोट द्वारे नियंत्रित करता येऊ शकते.
सोबत दाखविलेल्या चित्रानुसार, एक ड्रोन ला सामान्यतः चार पंख असतात. त्यामुळे ड्रोन ला क्वाड कॉप्टर (kwad copter) असे देखील म्हणतात. एका सामान्य विडिओ गेम मध्ये असते तसेच अगदी सोप्या पद्धतीने आपण ड्रोन ला एका रिमोट द्वारे नियंत्रित करू शकतो. रिमोट द्वारे आपण ड्रोन ची दिशा ठरवू शकतो, ड्रोन ला मागे पुढे नेऊ शकतो, तसेच ड्रोन मध्ये कॅमेरा असल्यास आपण ड्रोन द्वारे फोटो काढू शकतो किंवा विडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो.
एका सामान्य ड्रोन मध्ये पुढील प्रकारचे विविध भाग असतात. :-
एक मुख्य बॉडी असते, मुख्य बॉडी वर बाहेरून तसेच आतून संपूर्ण ड्रोन चे विविध इलेक्ट्रॉनिक भाग बसविलेले असतात. वरच्या बाजूने पाहता, मुख्य बॉडी वर आतून सूत्र व संचालनाकरिता तसेच काँनेक्टिव्हिटीकरिता जी. पी. एस. सिस्टिम बसविलेली असते. मुख्य बॉडी वरच चारही बाजूने थोडासा लांबट भाग असतो, त्याच्या शेवटच्या टोकावर मोटर बसविलेली असते व मोटर वरच रोटर म्हणजेच ड्रोन चे पंख बसविलेले असतात जे कि ड्रोन ला हवेत उडवून गती देतात.
ड्रोन चे प्रकार :-
भारतात मुख्यतः तीन प्रकारे ड्रोनचे वर्गीकरण करण्यात येते.
१. नॅनो ड्रोन (Nano Drone )
२५० ग्रॅम वजनापर्यंतच्या ड्रोन ला नॅनो ड्रोन म्हणतात. २५० किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या ड्रोन ला उडविण्याकरिता भारतात बंदी नाही व लायसन्स ची पण आवश्यकता नाही
२. मायक्रो ड्रोन (Micro Drone)
. २५० ग्राम पेक्षा जास्त परंतु, २ किलोग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या ड्रोन ला मायक्रो ड्रोन म्हणतात.
३. स्मॉल ड्रोन (Small Drone )
२ (दोन ) कि. ग्रॅ. पेक्षा जास्त परंतु २५ कि. ग्रॅ. पेक्षा कमी किंवा २५ कि. ग्रॅ. वजन असणाऱ्या ड्रोन ला स्मॉल ड्रोन म्हणतात.
४. मध्यम (आकाराचे) ड्रोन (Medium Drone )
२५ कि. ग्रॅ. पेक्षा जास्त परंतु १५० कि. ग्रॅ. पेक्षा कमी किंवा १५० कि. ग्रॅ. वजन असणारे ड्रोनला माध्यम ड्रोन (Medium Drone ) म्हणतात.
४. मोठे ड्रोन (Large Drone )
१५० कि. ग्रॅ. पेक्षा जास्त . वजन असणारे ड्रोनला मोठे ड्रोन (Large Drone )म्हणतात.
ड्रोन बद्दलची आव्हाने:
गोपनीयतेच्या समस्या, बॅटरीचे मर्यादित आयुष्य आणि क्रॅश यांसारख्या ड्रोन वापरण्याची आव्हाने ओळखा.
हवाई छायाचित्रे घेण्यापासून पॅकेजेस वितरीत करण्यापर्यंत विविध कारणांसाठी ड्रोनचा वापर केला जातो. परंतु, ड्रोन वापरण्याशी संबंधित अनेक आव्हाने व समस्या आहेत, जसे की गोपनीयतेचि समस्या, मर्यादित बॅटरी आयुष्य आणि अनावश्यक ठिकाणी होणारे ड्रोन क्रॅश.
जेव्हा लोकांच्या किंवा त्यांच्या मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी ड्रोनचा वापर त्यांच्या संमतीशिवाय केला जातो तेव्हा गोपनीयतेच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात ही एक मोठी समस्या उद्भवू शकते.
ड्रोनची बॅटरी लाइफ देखील एक समस्या आहे, कारण त्यांना नियमितपणे रिचार्ज करणे आवश्यक आहे आणि रिचार्ज करण्यापूर्वी ते केवळ मर्यादित वेळेसाठी किंवा जास्तीत जास्त अर्धा ते एक तास उड्डाण करू शकतात.
शेवटी, खराब हवामान, तांत्रिक बिघाड किंवा ड्रोन उडविणाऱ्या ऑपरेटरची त्रुटी यासारख्या विविध कारणांमुळे ड्रोन क्रॅश होऊ शकतात. क्रॅशमुळे ड्रोनचेच नुकसान होऊ शकते, तसेच लोकसंख्या असलेल्या भागात ड्रोन खराब होण्याची समस्या उद्भवल्यास लोकांना हानी किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
एकूणच, ड्रोनचा वापर फायदेशीर ठरू शकतो परंतु त्यांच्याशी निगडीत संभाव्य आव्हानांचा विचार करणे आवश्यक आहे. लोक आणि मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतल्यास ड्रोनशी संबंधित धोके कमी करण्यात मदत होऊ शकते.
ड्रोन वापरण्यासाठी सर्वोत्तम पद्धती:
तुम्हाला ड्रोन उडविण्याचा मजेदार आणि आनंददायी अनुभव मिळावा यासाठी ड्रोन सुरक्षितपणे उडविणे आणि कायदेशीररित्या वापरणे आवश्यक आहे. ड्रोन वापरण्यासाठी येथे काही नियम आणि पद्धती दिलेल्या आहेत:
नेहमी मोकळे असलेले क्षेत्र किंवा मोकळे मैदानी यांमध्ये उड्डाण करा, आणि तुम्ही ड्रोन वापरण्याअगोदर तेथे असेलेले स्थानिक निर्बंध किंवा नियमांचे पालन करा. किंवा त्याबाबतीत आपल्याला जाणीव राहू द्या.
तुम्ही ज्या भागात उड्डाण करत आहात त्या क्षेत्रासाठी आणि तुमच्याकडे असलेल्या विशिष्ट प्रकारच्या ड्रोनसाठी ड्रोनच्या उंचीच्या निर्बंधांकडे लक्ष द्या. बहुतेक ड्रोनची भारतातील मर्यादा हि १२० फूट असते.
लोक किंवा खाजगी मालमत्तेवरून ड्रोन चे उड्डाण करण्यापूर्वी तुमच्याकडे परवानगी असल्याची खात्री करा.
तुम्ही तुमचे ड्रोन नेहमी आपल्या नजरेसमोर आहे का? याची खात्री करा, कारण अनेक अधिकारक्षेत्रांमध्ये ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्याकरिता सोबत असलेले मॅनुअल व्यवस्थित वाचा.
उड्डाण करण्यापूर्वी तुम्ही हवामानाच्या परिस्थितीशी परिचित असल्याची खात्री करा आणि जोरदार वारा आणि वादळाच्या वेळी उड्डाण करणे टाळा.
तुमचे ड्रोन विमानतळ आणि इतर प्रतिबंधित हवाई क्षेत्रापासून दूर ठेवा.
तुमच्याकडे आवश्यक विमा आणि ड्रोन ची नोंदणी झाली असल्याबाबतचे कागदपत्रे असल्याची खात्री करा.
ड्रोन वापरताना या सर्व वरीलप्रमाणे गोष्टींचे पालन केल्याने तुम्हाला सुरक्षितपाने ड्रोन उडविण्यास मदत होईल. चला तर मग,आपल्या फ्लाइटचा आनंद घ्या!
ड्रोनचे भविष्य:
भविष्यात ड्रोनची क्षमता अमर्याद आहे. तंत्रज्ञानातील जलद प्रगतीमुळे, ड्रोन अधिक प्रभावीपणे आणि विविध कार्ये पूर्ण करण्यास सक्षम होत आहेत. डिलिव्हरी सेवांमध्ये ड्रोनचा सर्वाधिक वापर करण्याची चर्चा सध्या सुरु आहे. विदेशातील काही शहरांमध्ये Amazon आणि UPS सारख्या कंपन्या आधीच ड्रोन डिलिव्हरीचे प्रयोग करत आहेत आणि दुर्गम भागात वस्तू आणि सेवा वितरीत करण्यासाठी ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. ड्रोन मानवी हस्तक्षेपाशिवाय उड्डाण करण्यास सक्षम असल्याने मानवरहित उड्डाण देखील एक वास्तविकता बनत आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी ड्रोन वापरण्यापासून ते अवघड भूभागाचा नकाशा तयार करण्यासाठी त्यांचा वापर करण्यापर्यंत हे येणाऱ्या काळात ड्रोन द्वारे शक्य होऊ शकणार आहे. भविष्यात, ड्रोनचा वापर लोकांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. येणाऱ्या काळात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ड्रोनचा मोठा प्रभाव राहील यात शंका नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please, do not enter any spam link in the comment box