Elon Musk, his Tesla cars and his entry into India/ एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश

 एलोन मस्क, टेस्ला कार्स आणि त्याचा भारतातील प्रवेश

 Elon Musk, His Tesla cars, and his Entry into India


मित्रानो, आज आपला सर्वांचा कल पेट्रोल आणि डिझेल ची खपत कमी करण्याचा आहे. आणि भारतीय सरकार त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याच  दृष्टीने उचलले गेलेले पाऊल म्हणजे इलेक्ट्रिकल वाहने......  भारतात पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अजूनही महागडी असल्यामुळे भारतीय ग्राहक विशेषतः मध्यमवर्गीय लोक इलेक्ट्रिक वाहने घेण्यास उदासीन दिसून येतात.  

 हे देखील वाचा : Ten Stories (Ancient)/ दहा प्राचीन कथा आणि प्रेरणादायक भौगोलिक घटना

परंतु, गेल्या काही दिवसांपासून एलोन मस्क यांच्या  टेस्ला कार्स मुळे भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. विशेषतः टेस्ला ची गाडी अजून भारतीय बाजारपेठेत दिसून येत नाही तरी टेस्ला ब्रँड हा भारतीय बाजारात प्रचलित होत आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे एलोन मस्क महाशय आहेत तरी कोण? आणि त्यांची टेस्ला कार कशी आहे? आणि ती भारतीय कारांपेक्षा कशी वेगळी आहे? भारतात टेस्ला कारची किंमत काय असेल?

चला तर वरील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधूया. 

एलोन मस्क विषयी थोडक्यात ..... 

एलोन रीव्ह मस्क यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी कॅनेडियन आई आणि दक्षिण आफ्रिकेच्या वडिलांपासून झाला. त्यांचे कुटुंब दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया येथेच राहिले. 

एलोन मस्क यांनी २००२ मध्ये,  एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी स्पेसएक्सची (spacex) स्थापना केली, त्यापैकी ते सीईओ, सीटीओ आणि मुख्य डिझाइनर आहेत.

२००४  मध्ये, त्यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्ला मोटर्स, इंक. (Tesla Motors, Inc.) (आता टेस्ला, इंक.) ( Tesla, Inc.) चे अध्यक्ष व उत्पादन आर्किटेक्ट म्हणून रुजू झाले. २००८ मध्ये ते मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.

२००६ मध्ये त्यांनी सौर ऊर्जा सेवा कंपनी आणि सध्याच्या टेस्ला सहाय्यक कंपनी तयार करण्यास मदत केली. २०१५ मध्ये, त्यांनी ओपनएआय ही एक  नफा न घेणारी संशोधन कंपनी सह-स्थापना केली जी मैत्रीपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्तेला (friendly artificial intelligence) प्रोत्साहन देते. २०१६ मध्ये, त्याने मेंदू-संगणक इंटरफेस (brain-computer interfaces) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी न्यूरो तंत्रज्ञान कंपनी, न्यूरलिंकची सह-स्थापना केली आणि बोरिंग कंपनी ही बोगदा बांधकाम करण्याऱ्या कंपनीची स्थापना केली. मस्क यांनी हायपरलूप या हाय-स्पीड व्हॅक्ट्रिन  (Vactrain = Vacuum +Train) वाहतूक व्यवस्था देखील प्रस्तावित केली आहे.

एलोन मस्क यांच्यासंशोधनाविषयी सांगावे तेवढे कमीच आहे परंतु येथे फारच थोडक्यात व या ब्लॉग ला आवश्यक असणारी माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत आहे. 

एकंदरीत मस्क यांनी अत्यंत प्रगतिशील विचारधारेला चालना देऊन संशोधन सुरु ठेवलेले आहे. त्यांच्या संशोधनामुळे ते समीक्षकांच्या टीकाटिप्पणीला उत्तर द्यावे लागले. सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला अशा विषयांवर त्याच्या मतांसाठी टीका केली गेली आहे.

टेस्लाचे भारतातील कार्यालय नोंदणी.

टेस्लाने अखेर भारतात प्रवेश केला आणि ८ जानेवारी २०२१ रोजी बंगळुरुमध्ये कंपनी म्हणून नोंदणी केली. कंपनीच्या रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश करण्यात आला आहे आणि नोंदणीकृत पत्ता लाव्हले रोड, बेंगलुरू असा आहे.
टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी लिमिटेड शहराच्या मध्यभागी उघडण्यात आले. त्याचे संचालक म्हणून विभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन यांनी आरओसीकडे अर्ज दाखल करताना म्हटले आहे. 

 टेस्ला कार्स (Tesla Cars) 

टेस्ला आता भारतात दाखल झाली आहे. टेस्ला कंपनी जी इलेक्ट्रिक कारमध्ये अव्वल स्थानावर आहे. टेस्ला आता विमानासोबत शर्यत करते आणि जिंकते देखील. टेस्ला केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवकाशात देखील गेली आहे. इलेक्ट्रिक वाहन बणवणाऱ्या कंपन्या खूप आहे, परंतु भविष्यकालीन कार बनवणारी कंपनी टेस्ला आहे. भविष्यात ऑटो पायलट म्हणजे ड्रायव्हरशिवाय कार चालू शकेल त्याकरता तुम्हाला फक्त कार मधील ऍप उघडून त्यात तुम्हाला कुठे जायचे आहे तेवढे फक्त टाकायचे आणि बाकीचे काम गाडी स्वतः करेल म्हणजे तुम्हाला संभावित स्थानापर्यंत पोचवू शकेल. टेस्ला हि इलेक्ट्रिक कार असूनदेखील ० (शून्य) ते १०० (शंभर) चा वेग फक्त ३ सेकंदात गाठू शकते. इतकेच नाही टेस्ला ची एस यू व्ही (SUV) (मॉडेल एक्स) हि इतकी शक्तिशाली आहे कि ती चक्क एका बोईंग  ७८७ विमानाला देखील ओढून नेऊ शकते. टेस्ला इलेक्ट्रिक कार असल्यामुळे पेट्रोलचा खर्च नाही. तसेच शून्य उत्सर्जन असल्यामुळे वातावरणास अनुकूल असून त्यामुळे प्रदूषण होत नाही. 

टेस्ला ची भारतातील किंमत काय असेल? 

सर्वात स्वस्त असेलेली टेस्ला मॉडेल - ३ ची सुरुवातीची किंमत यू एस (u s) मध्ये ३८००० (३८k) आहे. परंतु, भारतात दाखल झाल्यानंतर सामान्यांच्या बजेटच्या बाहेर या गाडीची  सुरुवातीची किंमत जवळ जवळ साठ लाखांपासून (60.00 Lacs) असेल. 

परंतु हि कार इतकी महाग असण्याचे कारण काय?

कारण हि कार सी. बी. यू. (C.B.U. = Completely Built Up) कार असेल. म्हणजेच हि कार भारतात तयार न होता पूर्णतः तयार कार विदेशातून आयात केली जाईल आणि भारतात विकली जाईल. अश्या आयात केलेल्या कार्स / गाड्यांवर १०० टक्के आयात शुल्क लागते त्यामुळे या गाड्यांची किंमत हि भारतात येता येता दुप्पट होऊन जाते. 

टेस्ला मुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर / वाहनांवर परिणाम होईल का?

भारतासारख्या, किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील बाजारपेठेत, सामान्य ग्राहकांना न परवडणारी, तसेच १०० टक्के आयात शुल्क लागून किंमत दुप्पट झाल्यामुळे, टेस्ला कारला भारतात सुरुवातीला पाय रोवण्यात अडचणी येऊ शकतील. बहुतेक लक्झरी कार कंपन्या अनेक वर्षांपासून भारतात अस्तित्वात असूनही, एकूणच प्रवासी वाहन बाजारात लक्झरी कारचा वाटा फक्त एक टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणून भारतात नवीन इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत किमतीनुसार चढाओढ होत राहिल्यामुळे टेस्ला मुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर पाहिजे तसा परिणाम होणार नाही. 

परंतु, टेस्ला चे दर कमी करण्यासाठी आणि भारतीय बाजारपेठेत यश सुनिश्चित करण्यासाठी टेस्लाला येत्या काही वर्षांत भारतात उत्पादन प्रकल्प स्थापित करावा लागेल, हे नाकारता येणार नाही. 

इलेक्ट्रिक कारचे फायदे आणि नुकसान

(Pros and Cons/Advantages and Disadvantages)

इलेक्ट्रिक कारचे फायदे :-

१. उच्च कार्यक्षमता 

२. उच्च प्रतिक्रिया 

३. ध्वनी प्रदूषण नाही. 

४. एक वाहन म्हणून कुठलेही प्रदूषण नाही. 

५. देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी 

६. अधिक सुरक्षित. 

७. एकल गती प्रसारण (Single Speed Transmission)

८. उच्च टॉर्क आणि पॉवर 

९. प्रभावी घर्षण नियंत्रण.

इलेक्ट्रिक कारचे तोटे :-

१. चार्जिंग साठी जास्त वेळ लागतो 

२. प्रवासातील अंतरावर मर्यादा. 

३. किंमत जास्त.

 “केंद्राचा विचार आहे की सन २०३० पर्यंत खासगी कारसाठी ३० टक्के, व्यावसायिक कारसाठी ७० टक्के, बसेससाठी ४० टक्के आणि दोन आणि तीन चाकी वाहनांसाठी 80 टक्के विविध प्रकारचे प्रोत्साहन देऊन विद्युत वाहनांची विक्री करण्याचा/वाढविण्याचा विचार आहे. त्यामुळे  "ईव्ही बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे," असे परिवहन मंत्र्यांचे म्हणणे आहे. 

मित्रांनो, येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल यात शंका नाहीच! म्हणून आपल्याला देखील येणाऱ्या काळासाठी सज्ज राहायला हवे. 

आपल्याला वरील टेस्ला कार बद्दल माहिती, भारतातील किंमत,  भारतामध्ये टेस्ला महाग असण्याची कारणे, टेस्लाचा भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारावर होणार परिणाम, तसेच, इलेक्ट्रिक कारचे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्राना पुढे पाठवा आणि आपले काही विचार किंवा सूचना असतील तर तेही कंमेंटद्वारे सुचवा. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुठे गेली दिवाळी? / माझ्या आठवणीतली दिवाळी!!!/दिवाळी २०२४/Where did Diwali go? / Diwali in my memories!!!/Diwali 2024

"बैल पोळा 2024: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तिथी, शुभ मुहूर्त, आणि सणाचे महत्त्व"

गणेशोत्सव 2024: भक्ती आणि संस्कृतीचा भव्य उत्सव/Ganesh Festival 2024: A Grand Celebration of Devotion and Culture