Jay adivasi/Jagtik Adivasi Din/9 Aug/World Tribal Day/ जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट
जय आदिवासी / जागतिक आदिवासी दिन /९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणजे काय? त्यामागील मूळ संकल्पना काय आहे? दुसऱ्या महायुद्धाचे चटके सहन केल्यानंतर, जगात सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, आतंकवाद हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर झाल्यात. या सर्व विचारांनुसार २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघात एकूण १९२ देश सदस्य असून त्यात भारताचा देखील समावेश होतो. स्थापनेचे ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात आले कि, २१व्या शतकात आजदेखील जगातील बहुतांश आदिवासी समाज उपेक्षित जीवन जगात आहे. गरिबी, अशिक्षितपणा, मजुरी, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी अश्या अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला होता. या विळख्यातून बाहेर पडणे आदिवासी समाजाला अशक्य होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून, सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा सर्व सम...