#Gudipadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३/What is mean by Gudipadwa?
#GudiPadwa२०२३/ #गुढीपाडवा २०२३ गुढीपाडवा म्हणजे काय?/What is mean by Gudipadwa?#Muhurt, #Rituals and #Significance of #Gudi Padwa या वर्षी गुढीपाडवा बुधवार, दिनांक २२ मार्च २०२३ रोजी येत आहे. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे "चैत्र शुद्ध प्रतिपदेला" म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रांतात साजरा केला जातो. "शालिवाहन संवत्सराचा" पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ नवउपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी, इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हि विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ "लाकूड अथवा काठी आहे." तसाच तो "तोरण" असाही आहे. गुढीपाडवा हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, संवत्सर पाडवो अथवा उगादी अश्या वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो तर सिंधी बांधव चेटीचंद नावाने या उत्सवाला संबोधतात. गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप कसे असते?/Structure/n...