Sankalp/संकल्प/31December
संकल्प आज दिनांक ३१/१२/२०१९, लक्षात आले असेलच आज ३१ डिसेंबर! नेहमीप्रमाणे तयारी करून मी माझ्या मोटर सायकलने रस्त्याने भरधाव निघालो, सकाळचे ८.४५ झाले होते, पण काय मोठे आश्चर्यच घडले. रस्ता कसा सामसूम होता. मनात वेगळेवेगळे विचार सुरु झालेले होते. एकटाच होतो, डिसेम्बरची थंडी कमालीचं गारठा देत होती. मनात विचार येत होता कि, काय आज मी पण ३१ डिसेंबर हा दारू पिऊन साजरा करावा? कि, मग मी पण कुठेतरी पार्टीत जाऊन किंवा शेतात जाऊन एकदम झिंगाट व्हावे काहीच सुचत नाही. आज शहरात किंवा गावात सुद्धा पब, बार, मॉल सगळं अगदी एखाद्या नवीन नवरीप्रमाणे सजून तयार असतील. कोणी कार्यक्रमांची जय्यत तयारी केलेली असेल, तर कोणी हॉटेलमध्येच सगळी तयारी केलेली असेल. आणि जास्त धमाल करण्याकरिता तर काही ठिकाणी नवीन नवीन ऑफर देखील आलेल्या असतील. मला पण या गोष्टींचं खूपच आकर्षण वाटते. खरंतर वर्ष २०१९ हे मला फारच वाईट गेले, काय मी माझ्या नाशिबाला दोष देऊ कि मग नेहमीप्रमाणे फक्त लढतच पुढे वाटचाल करत राहू? जस जसे वर्ष जात आहेत तशी ती वर्ष मला माझ्या एका वर्षाने वयस्कर...