#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या
सोनेरी कोंबड्या #Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या (आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...) ......... मग खूप वर्ष उलटलीत मी तो विषय विसरलो होतो पण अचानक हातात एक पुस्तक आले आणि मला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली आणि उत्तरही मिळाले....... (उत्तरार्ध ) .......एके दिवशी सहजच फिरायला निघालो मधेच रस्त्यात एक लायब्ररी दिसली आणि शेजारीच एक पुस्तकांचे भव्य प्रदर्शनही भरले होते. मला पूर्वीपासूनच पुस्तके चाळन्याची सवय होती आणि त्यावेळी मनोरंजनासाठी आतासारखे मोबाइल पण नव्हते, खूपच छान आणि मनोरंजन करणारे कलर आणि स्मार्ट टीव्ही पण नव्हते त्यामुळे एकतर सिनेमा/ नाटक पाहणे, फिरायला जाणे, किंवा उरले सुरले तर वर्तमान पत्रे वाचणे आणि पुस्तके वाचत राहणे एवढाच पर्याय आमच्यासमोर होता आणि तीच मनोरंजनाची साधने होती. मग त्या लायब्ररीत अचानकच एका पुस्तकावर पडली म्हणून मी ते पुस्तक ताबडतोब अघाश्यासारखे वाचायचे ठरवले आणि ते पुस्तक लायब्ररीत नोंद करूंन घरी नेले. त्या पुस्तकाशी माझे बालपणाचे क्षण किंवा आठवणी जुडलेल्या होत्या ...