पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#Soneri Kombdya #Golden Hens #सोनेरी कोंबड्या

इमेज
सोनेरी कोंबड्या   (आमचे प्रिय, बापू मामा यांच्या आठवणीतून...)          असेल साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट,   मी खूप लहान होतो, आमचे आजी आणि बाबा हे त्यावेळी टोपलीमध्ये फळे विकण्याचे काम करायचे. त्याकरिता त्यांना पहाटे उठून मार्केट मध्ये जाऊन फळे विकत घ्यावी लागायची. मी लहान असल्यामुळे मला मार्केट काय असते, फळे कशी विकत घेतात, बाजारात गर्दी असते ते सगळं पाहायची मनापासून खूप उत्सुकता होती.  आजीकडे तसे वातावरण छान होते जसे  गावात असते ना अगदी तसेच. म्हणजे आजीने कोंबड्या पाळलेल्या होत्या,  बकऱ्या पाळलेल्या होत्या, आणि एक खंड्या नावाचा कुत्रा पण होता. मला माहीत नाही पण मी जेवायला बसलो कि तो कुठे का असेना आपोआप येऊन जायचा त्याला आपोआपच समजायचे कि, मी जेवत आहे मग तो पळत पळत यायचा आणि त्याची इवलीशी शेपूट हलवून जणू माझ्याकडे भाकर मागायचा. आजीच्या हातची बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा माझा आवडीचा होता.      एके दिवशी, मी सकाळी सकाळी न्याहारी केली आणि मला बाजार पाहायचा होता म्हणून आजी आणि बाबा...